बुलढाण्यात पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू; कुटुंबीयांना मानसिक धक्का

बुलढाण्यात पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू; कुटुंबीयांना मानसिक धक्का
बुडून मृत्यू
Image Credit source: tv9 marathi

वेदांत पाण्यात पडल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेदांतचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गणेश सोळंकी

| Edited By: महादेव कांबळे

May 22, 2022 | 8:03 PM

बुलढाणाः घराच्या अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाक्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Drowning death) झाल्याची घटना बुलढाणा शहरातील (Buldhana City) धाड नाका परिसरात घडली आहे. शिवाजी बोर्डे यांचा दीड वर्षांचा मुलगा वेदांत घरात खेळत असतांना तो अंगणात गेला. घरातून खेळण्यासाठी अंगणात आलेला वेदांत (Vedant Borde) खेळाच्या नादात पाण्याच्या टाक्यात पडला. दीड वर्षाच्या वेदांतच्या या मृत्यूमुळे त्याच्या परिसरातील अनेकांना धक्का बसला.

वेदांत घरामध्ये खेळत असताना तो घरात दिसला नसल्याने त्याला शोधण्यासाठी म्हणून घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी बाहेर आले तेव्हा तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाण्याच्या टाकीत पाण्याचा साठा करुन ठेवला असल्याने वेदांत पडल्या पडल्या त्याच्या नाका तोंडात पाणी गेले असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नजर चुकवून बाहेर आला

वेदांत घरात दिसल्याने घरच्यांनी शोध घेतल्यावर तो पाण्याच्या टाक्यात पडल्याचे लक्षात आले. दुपारची वेळ असल्याने घरातील सदस्य आतमध्येच बसले होते, त्यांची नजर चुकवून खेळत खेळत तो बाहेर आला. त्यावेळी पाण्याच्या टाकी जमिनीबरोबर असल्याने आणि ती बंद केली गेली नसल्यामुळे तो अचानक पाण्यात पडला.

परिसरात हळहळ

वेदांत पाण्यात पडल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेदांतचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वेदांत लहान असल्याने परिसरात तो अनेकांचा लाडका होता. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें