AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs AFG Live Streaming : न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची संधी, जिंकणार?

New Zealand vs Afghanistan T20 World Cup 2026 Live Match Score : अफगाणिस्तान क्रिकेट टीमने गेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता.

NZ vs AFG Live Streaming : न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची संधी, जिंकणार?
Afghanistan vs New Zealand T20i World Cup 2026Image Credit source: @ACBofficials X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 08, 2026 | 2:53 AM
Share

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. उभयसंघातील हा सामना रविवारी 8 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. ऑलराउंडर राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. न्यूझीलंडला या सामन्यात विजयी सुरुवात करुन खास कामगिरी करण्याची संधी आहे. मात्र ट्रॅक रेकॉर्ड पाहता न्यूझीलंडसाठी ते सोपं नाहीय.

न्यूझीलंड हिशोब बरोबर करणार?

न्यूझीलंडकडे या सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची सुवर्ण संधी आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर गेल्या टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडकडे 2 वर्षांनी या सामन्यानिमित्ताने पराभवाची वसुली करण्याची नामी संधी आहे. मात्र अफगाणिस्तान न्यूझीलंडला सहजासहजी हा सामना जिंकून देणार नाही. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना कधी?

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना रविवारी 8 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना कुठे?

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?

न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅच हॉटस्टार एपद्वारे पाहता येईल.

न्यूझीलंड पराभवाची वसूली करणार का?

गयानामधील प्रोव्हीडेन्स स्टेडियममध्ये गेल्या टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीत अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता. उभयसंघात 7 जून रोजी हा सामना खेळवण्यात आला होता. अफगाणिस्तानने या सामन्यात पहिले बॅटिंग करताना न्यूझीलंडसमोर सन्मानजनक आव्हान ठेवलं होतं.  अफगाणिस्तानने 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने त्यानंतर 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 28 बॉलआधीच गुंडाळून सामना जिंकला होता.  अफगाणिस्तानने न्यूझीलंडला 15.2 ओव्हरमध्ये 75 रन्सवर गुंडाळलं होतं. अफगाणिस्तानने अशाप्रकारे 84 धावांनी सामना जिंकला होता. आता न्यूझीलंड या पराभवाची परतफेड करत वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना