भाजप ईडीला प्रेमपत्र, ती मोदी आणि शाहांची गुलाम : अमोल मिटकरी

| Updated on: Dec 27, 2020 | 11:52 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर सर्वच स्तरातून मोदी सरकार आणि ईडीवर सडकून टीका होत आहे.

भाजप ईडीला प्रेमपत्र, ती मोदी आणि शाहांची गुलाम : अमोल मिटकरी
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर सर्वच स्तरातून मोदी सरकार आणि ईडीवर सडकून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील ईडी आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. “भाजपची ईडी आता सनम बेवफा झालीय. 2014 नंतर भाजपच्या घोटाळे बहाद्दरांनी अनेक घोटाळे केले, पण भाजपची ईडी तिकडे फिरकलीच नाही,” असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय (NCP leader Amol Mitkari criticize ED BJP and Modi Government).

अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे. ‘तुने दिल मेरा तोडा, कईबार ना छोडा, सनम बेवफा’. 2014 नंतर भाजपच्या घोटाळे बहाद्दरांनी अनेक घोटाळे केले. मग तो तुर डाळीचा घोटाळा असेल, बँकेचा घोटाळा, चिक्कीचा घोटाळा अशा ठिकाणी भाजपची ईडी कशी फिरकली नाही. गेल्या 2-4 दिवसांपासून एकाच बाजूने जातेय. काल मी भाजप ईडीला प्रेमपत्र लिहिलं. त्यात मी म्हटलं होतं की एकतर या भाजपवाल्यांकडे जाऊन ये.”

“जय शाहाची 900 कोटी रुपयांची संपत्ती झाली. तिकडे तु गेली नाहीस. 2014 नंतर भाजपच्या घोटाळे बहाद्दरांकडे तुला जावं वाटलं नाही. एखादा कप चहा प्यायला तिकडे पण जा. मला माहिती आहे तु नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची गुलाम आहे. तुझा गैरवापर करुन महाराष्ट्रात तुझाच अपप्रचार सुरु आहे. तुझ्यावरील नागरिकांचा विश्वास कमी होतोय. त्यामुळे हे भाजपप्रिय ईडी माझ्या प्रेमपत्राचा जरा गांभिर्याने विचार कर,” असंही अमोल मिटकरी म्हणाले.

हेही वाचा :

Sanjay Raut | पत्नीला ईडीची नोटीस, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला; येऊ द्या नोटीसा: सुप्रिया सुळे

ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला

NCP leader Amol Mitkari criticize ED BJP and Modi Government