Sanjay Raut | पत्नीला ईडीची नोटीस, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut | पत्नीला ईडीची नोटीस, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणात किती ताकद आहे हे पाहूच असं ट्विट करत त्यांनी ईडीला आणि मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे आव्हानच दिलं आहे. मागील अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी उघडउघड भाजप आणि मोदी सरकारवर टीका केल्यानेच ही ईडीची नोटीस पाठवल्याचा आरोप शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय (Sanjay Raut first comment on ED notice to wife).

संजय राऊत यांनी हिंदीमध्ये ट्विट करत म्हटलं, “आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया”. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावलं आहे. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

“मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

विरोधात गेले तर अशाप्रकारची कारवाई – सचिन सावंत 

या प्रकरणावर बोलताना काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, “भाजपचे जे अलिशान कार्यालये आहेत त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावे. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधी आहेत म्हणून जुने प्रकरण उकळून काढून केवळ त्रास दिला जातोय. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं.”

“प्रताप सरनाईक यांचं प्रकरण बघितलं तर 2014 साली टॉप सेक्युरिटीला एमएमआरडीएने कंत्राट दिलं. 2017 साली ते पुन्हा दिलं गेलं. त्यावेळी फडणीस सरकार होतं. फडणवीस एमएमआरडीएचे अध्यक्ष होते. त्यांनी स्वत: कंत्राट दिलं. पण ते का दिलं म्हणून त्यांना विचारलं जात नाही,” अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली.

हेही वाचा :

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला; येऊ द्या नोटीसा: सुप्रिया सुळे

Sanjay Raut first comment on ED notice to wife

Published On - 9:04 pm, Sun, 27 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI