संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोडी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (PMC bank scam latest update).

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 9:40 PM

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोडी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत (PMC bank scam latest update).

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती.

काय आहे PMC बँक घोटाळा?

रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये एका व्हिसल-ब्लोअरच्या मदतीने पीएमसी बँकेने खोटे बँक खाते दाखवत एका रियल इस्टे डेव्हलोपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती मिळाली. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतून रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले.  हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

पीएमसी बँकेचे देशभरात 137 शाखा आहेत. विशेष म्हणजे या बँकेतील सर्वाधिक खातेदार हे मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिक होते. त्यामुळे त्यांना या घोटाळ्याचा मोठा फटका बसला (PMC bank scam latest update).

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत बऱ्याच जणांना अटक करण्यात आली आहे. ईडीने 16 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला अटक केली होती. त्याआधी ईओडब्ल्यू बँकेचे माजी संचालक वरयाम सिंह, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि एचडीआयएलचे प्रवर्तक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौकशीनंतर माजी संचालक सुरजीत सिंह अरोडा, एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन, बँकचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि माजी संचालक जॉय थॉमस यांना अटक केली होती. त्याशिवाय ऑडिटर जयेश संघानी, केतन लकडावाला यांनाही अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

याप्रकरणी ईडीने मोठमोठ्या धाडी टाकल्या होत्या. या धाडीत ईडीला घबाड सापडलं होत. ईडीला अलिबागमध्ये तब्बल 22 फ्लॅट सापडले असून यातील लॅविश फ्लॅटचा ईडीने ताबा घेतला होता. हे कमी म्हणून की काय ईडीला एचडीआयएलच्या प्रमोटर्सच्या नावावर एक विमान असल्याचं आढळलं होतं. त्याचबरोबर एक छोटं जहाजही सापडलं होतं.

पीएमसी बँक प्रकरणी ठाकरे सरकारचा निर्णय

दरम्यान, ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. या घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली होती.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.