AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवले, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती.

टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवले, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल
Harshvardhan Sapkal
| Updated on: Feb 14, 2026 | 11:07 PM
Share

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुल्तान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर राज्य सरकारने जोरदार टीका केली होती. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे येथील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांची तसबीर लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला होता.

देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका

यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस लांगुनचालनासाठी काहीही करु शकते.खरं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी टिपू सुलतान यासारख्या नराधमाची तुलना शिवाजी महाराजांशी करणे अतिशय निंदनीय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केले. मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य तयार केले. त्याच वेळी हजारो-लाखो हिंदूंची टिपू सुलतान याने हत्या केली होती.

टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे, दोघांनाही समकक्ष मानणे यापेक्षा जास्त लांगूलचालन मी या जन्मात पाहिले नाही,” अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली. तसेच सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात