AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून अमेरिकेला ओपन चॅलेंज, जग हादरलं, युद्धाचा भडका, थेट एक इंच ही…

अमेरिका इराण युद्ध भडकले आहे. यादरम्यानच आता अत्यंत मोठा इशारा इराणकडून देण्यात आला. यामुळे अमेरिकेच्या स्वप्नांवर पाणी फिरणार हे नक्की आहे. इराणकडून आपली भूमिका या युद्धाबाबत स्पष्ट करण्यात आली.

इराणकडून अमेरिकेला ओपन चॅलेंज, जग हादरलं, युद्धाचा भडका, थेट एक इंच ही...
US Iran War
| Updated on: Mar 08, 2026 | 1:29 PM
Share

रशियाकडून इराणला सिक्रेट डाटा देण्यात आल्याचा आरोप करत अमेरिकेने खळबळ उडवली. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाला आठ दिवस झाले. मोठं मोठे हल्ले करण्यात आली. अमेरिकेच्या पाठिशी अनेक देश उभे राहिले. मात्र, इराण गेल्या आठ दिवसांपासून एकटाच लढत आहे. रशिया, उत्तर कोरिया आणि चीनने फक्त हे युद्ध थांबवा म्हणत अमेरिकेचा निषेध केला. पण प्रत्यक्षात कोणीही इराणच्या मदतीला आले नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर होते. इस्त्रायलमधून नरेंद्र मोदी निघताच युद्धाला सुरूवात झाली. सुरूवातीला अमेरिका आणि इस्त्रायलकडून सांगण्यात आले की, आम्ही जर इराणवर हल्ला केला नसता तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला असता. या युद्धात सर्वात जास्त रिफायनरीचे नुकसान झाले.

इराणसोबत, साैदी, कतार आणि कुवेतमध्ये नुकसान झाले. इराणवर हल्ला झाल्यानंतर ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्यामध्येही इराणकडून हल्ला करण्यात आला. ओस्लोमध्ये अमेरिकेच्या दूतावासाजवळ अत्यंत मोठा धमाका झाला. दूतावासाचे नुकसान झाल्याचीही माहिती आहे.

काल रात्री तेहरानमध्ये मोठे बॉम्ब हल्ले झाले. इस्त्रायलकडून इराणच्या मुख्य प्रकल्पांना टार्गेट करत हल्ले करण्यात आले. यादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणचा पराभव झाला असून त्यांनी आत्मसमर्पण केले आहे आणि माफीही मागितली. इराणचे मसूद पेझेश्कियान यांनी तणावात मोठे संकेत देत आपल्या शेजारी देशांची हल्ल्याकरिता माफी मागितली होती.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा युद्धात पराभव झाला असून त्यांनी माफी मागत आत्मसमर्पण केल्याचे म्हटले. हेच नाही तर मसूद पेझेश्कियान यांनी आपल्या शेजारच्या देशांना आपले भाऊ म्हटले होते. आमच्या शेजारी देशांवर हल्ला करण्याचा कोणतीही इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यादरम्यानच इराणकडून कुवेतच्या विमानतळाला शिकार बनवण्यात आले. अमेरिका आपले लष्कर इराणी जमिनीवर उतरवण्याच्या तयारीत असतानाच इराणकडून मोठा इशारा देत स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, आम्ही आमच्या जमिनीचा एक इंच तुकडाही देणार नाहीत.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...