AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्पशाहीला दणका! दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारे डोनाल्ड ट्रम्प स्वत:च पडले खड्ड्यात, थेट गुंतवणूकदार..

इराणसोबतच्या युद्धाचा मोठा फटका अमेरिकेला बसत आहे. आपण फक्त इराणचे नुकसान करत आहोत, आपले या युद्धात काहीच जात नसल्याचे अमेरिकेला वाटत आहे. मात्र, हे युद्ध अमेरिकेच्याच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.

ट्रम्पशाहीला दणका! दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारे डोनाल्ड ट्रम्प स्वत:च पडले खड्ड्यात, थेट गुंतवणूकदार..
Donald Trump
| Updated on: Mar 08, 2026 | 12:54 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले असून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल मिळून हल्ले करत आहे. सतत दोन्ही देशांचे हल्ले सुरू आहेत, पण इराण हार मानताना दिसत नाही. उलट इराणकडून मोठे हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या ठिकाणी केले जात आहे. इस्त्रायलकडून इराणचे तेल साठ्यांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणमधील शस्त्रसाठा नष्ट करण्यासाठी अमेरिका आपल्या लष्कराला थेट मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणी तळांवर टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणच्या बहरीन बंदरावर मोठा हल्ला करण्यात आला. इराणचे 300 मिसाईल लॉन्चर नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला. या हल्ल्यात सर्वात जास्त नुकसान इराणी लोकांचे होत असून हल्ल्यात जीव जात आहेत.

1000 पेक्षा अधिक लोकांचा आतापर्यंत जीव गेल्याची माहिती मिळत आहे. तेहरानमध्ये तेलवाहू पाईपलाईनला मोठी आग लागली. दुबईतील मोठ्या इमारतींना आग लागल्याने मोठे नुकसान झाले. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्धाचा परिणाम सर्वात जास्त आखाती देशांना बसतोय. अर्थव्यवस्था ढासळताना दिसत आहे. युद्धामुळे कुवेत, कतार, अरब अमिराती, साैदी अरेबिया या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोळी झळ लागली आहे.

साैदी अरेबिया म्हटले की, पर्यटकांना सर्वात सुरक्षित ठिकाण वाटते. मात्र, सध्याची स्थिती बघता भविष्यात पर्यटकाला मोठा फटका बसला. अनेक पर्यटक या युद्धाच्या स्थिती अडकून पडले होते. अमेरिकेसोबतचे गुंतवणूकदार आपल्या भविष्याचा विचार करत आहेत. या युद्धामुळे तेल वाहतूक मंदावली आहे. दूतावासावरील हल्ले, पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान विमानतळांचे झालेले नुकसान यामुळे काही वर्ष या देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार हे स्पष्ट आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाैऱ्यानंतर या आखाती देशांनी अमेरिकेमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते. तसे काही करारही करण्यात आले. मात्र, आता ते या गुंतवणुकीवर विचार करत आहेत, हा मोठा फटका अमेरिकाला म्हणावा लागेल. हेच नाही तर बरेच लोक या युद्धात आमच्या देशाला ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. दुबई, कतार, कुवेतमध्ये मोठे नुकसान झाले.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर