AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ T20 WC Final 2026 : फायनलआधी जसप्रीत बुमराहबद्दल टेन्शन देणारी माहिती, क्रिकेट फॅन्सची एकच प्रार्थना असेल की आज…

IND vs NZ T20 WC Final 2026 : आज टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळणार आहे. या मॅचआधी भारताचा स्ट्राइक बॉलर जसप्रीत बुमराहबद्दल एक टेन्शन देणारी माहिती समोर आलीय.

IND vs NZ T20 WC Final 2026 : फायनलआधी जसप्रीत बुमराहबद्दल टेन्शन देणारी माहिती, क्रिकेट फॅन्सची एकच प्रार्थना असेल की आज...
jasprit bumrah Image Credit source: PTI
| Updated on: Mar 08, 2026 | 1:32 PM
Share

India vs New Zealand T20 World Cup Final : टी20 क्रिकेटमध्ये एक ओव्हरही निर्णायक ठरु शकते. हे अनेकदा दिसून आलय. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सेमीफायनल सामन्यात हे दिसून आलं. जेव्हा इंग्लंडची टीम 254 हे अवघड वाटणारं लक्ष्य गाठेल असं दिसत होतं. त्यावेळी 18 व्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वकाही बदललं. असं झालं नसतं, तर आज 8 मार्चला रविवारी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारता ऐवजी इंग्लंडची टीम असती. आता भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचलीय तर पुन्हा एकदा बुमराहकडून जबरदस्त प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया फायनल खेळण्यासाठी उतरेल तेव्हा बुमराहसाठी सुद्धा आव्हान सोपं नसेल. तुम्ही हे वाचून, ऐकून थोडे हैराण व्हालं. पण वास्तव सुद्धा समजून घ्या. जगात मोठ मोठ्या फलंदाजांना नाचवणारा, अनेक टीम्सना गुडघे टेकायला भाग पाडणारा बुमराह अनेकदा न्यूझीलंड विरुद्ध संघर्ष करताना दिसलाय.

तिन्ही फॉर्मेटमध्ये शानदार प्रदर्शन, पण…

जसप्रीत बुमराह हा भारतीय टीमचा स्टार गोलंदाज आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केलय. पण तिन्ही फॉर्मेटमध्ये फक्त न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात त्याच्या कामगिरीत घसरण दिसून आलीय. टेस्ट, वनडे आणि टी20 इंटरनॅशनलमध्ये बुमराहचे संपूर्ण करिअरमध्ये शानदार आकडे आहेत. पण न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात त्यात घसरण होते.

न्यूझीलंड विरुद्ध काय होतं?

टेस्टमध्ये बुमराहचा करिअर एवरेज 19.79 आहे. पण तोच न्यूझीलंड विरुद्ध 45.44 आहे. वनडेत करिअर एवरेज 23.55 आहे. पण न्यूझीलंड विरुद्ध 39.20 आहे. T20I मध्ये करिअर एवरेज 18.57 आहे. न्यूझीलंड विरुद्ध तो वाढून 23.37 होतो. बॉलिंग स्ट्राइक टेस्ट मध्ये 42.8 ने वाढून 92.8 (vs NZ) होतो. वनडेत 30.7 च्या तुलनेत 48.6 (vs NZ) आणि टी20 मध्ये 17 च्या जागी 19.8 (vs NZ) होतो. बुमराहने न्यूझीलंड विरुद्ध 5 टेस्टमध्ये 9 विकेट, 13 वनडेत 15 विकेट आणि 14 टी20 सामन्यात 16 विकेट न्यूझीलंड विरुद्ध घेतले आहेत.

भले यावेळी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत नसेल, पण…

फायनलमध्ये जसप्रीत बुमराहने कमाल करावी व हे आकडे चुकीचे ठरावेत ही भारतीय टीमची प्रार्थना असेल. टीम इंडियाने याआधी 2024 चा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी बुमराहने अनेक सामन्यात फायनल ओव्हर्समध्ये बाजी पलटली होती. तो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराचा मानकरी ठरलेला. आता फायनलमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. तो भले यावेळी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत नसेल, पण टुर्नामेंट भारताच्या बाजूने वळवू शकतो.

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.