मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) साम-दाम-दंड-भेद वापर करण्यात आला. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन फेरनिवडणूक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने केली आहे. नुकतंच त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे अॅड नितीन माने यांनी याबाबतची मागणी केली आहे. (NCP Legal Cell Wrote Letter on re-election of Pandharpur-Mangalvedha by-election)
राष्ट्रवादीच्या लीगल सेलच्या पत्रात काय?
विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले. त्यामुळे धमक्या देण्याचा संशय निर्माण होत असून, त्या संदर्भातील काही मागण्या..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक फेरनिवडणूक घेण्याबाबत सहा विविध मागण्या केल्या आहेत. याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवलं आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी (2 मे) पार पडली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1 लाख 09 हजार 450 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 05 हजार 717 मत मिळाली. अवघ्या 3733 मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.
(NCP Legal Cell Letter Election Commission re-election of Pandharpur-Mangalvedha by-election)
संबंधित बातम्या :
“भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”