AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला”; पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्याची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला," अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. (gopichand padalkar pandharpur mangalwedha by election)

अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला; पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
| Updated on: May 02, 2021 | 5:59 PM
Share

सांगली : “मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदासंघातील पोटनिवडणुकीचीसुद्धा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचा विजय झाला. या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी वरिल प्रतिक्रिया दिली. ते सांगलीत बोलत होते. (Gopichand Padalkar criticizes Mahavikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

गोपीचंद पडळकर काय म्हणाले ?

“पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात आला. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादी नेते त्यांचा उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस माराष्ट्राची गरज

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणाविषयी भाष्य केले. त्यांनी यापुढेसुद्धा भाजपची विजयी घोडदौड कायम राहील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत, असेसुद्धा वक्तव्य त्यांनी केले. यावेळी करेक्ट कार्यक्रम पंढरपूर मध्ये करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनतर पुढचा करेक्ट कार्यक्रम करतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत. या मतदारसंघाने तसं दाखवून दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

पंढरपूर मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांचा विजय 

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा मतदासंघाच्यी पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (02 मे) पार पडली. यावेळी मतमोजणी करताना समाधान आवताडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. ते 3733 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयामुळे राज्याच्या भाजपमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप महाविकास आघाडीला सामोरे जाईल, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय

West Bengal Election Results 2021 LIVE: ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली; चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारींचा पराभव

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

(Gopichand Padalkar criticizes Mahavikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

Follow Us
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर.....
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट,
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण
एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं
Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा,
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर!
Shivsena ubt | ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर! मालमत्तेच्या चौकशीने खळबळ
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353
Video | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
खिशाला कात्री! केस कटिंग, दाढी आणि फेशिअल झाले महाग; राज्यभर 20% दरवाढ
Hair Cutting Price | खिशाला कात्री! केस कटिंग, दाढी आणि फेशिअल झाले महाग; राज्यभर 20% दरवाढ लागू
कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक
Cockroach Janata party Protest | कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल