2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

| Updated on: May 02, 2021 | 11:30 PM

2021 Vidhan Sabha Election Results Counting LIVE Updates : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये डाव्या पक्षांची एलडीएफ, आसाममध्ये भाजप, पुद्दुचेरीत एनडीए आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर आहे

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन
पाच राज्यांचा निवडणूक निकाल

मुंबई : पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, केरळमध्ये डाव्या पक्षांची एलडीएफ, आसाममध्ये भाजप, पुद्दुचेरीत एनडीए आणि तामिळनाडूमध्ये द्रमुकनं सत्ता मिळवली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन, आसामध्ये सर्वानंद सोनेवाल हे मुख्यमंत्री त्यांची सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत. तर, तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये सत्तातंर झालंय. तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. (West Bengal tamilnadu assam kerala puducherry State assembly election results 2021 Live Counting news updates in marathi)

West Bengal Result Live: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सरशी

भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देत ममता बॅनर्जी यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेस 209 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 82 तर इतर 2 जण आघाडीवर आहेत. देशाचं लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममधून भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाला आहे. आहे. ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेत स्वत:चा पराभव स्वीकारला. तर, निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगानं सहकार्य केलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

Assam Election Result live: आसाममध्ये भाजपनं सत्ता टिकवली

पूर्वेकडील महत्वाचं राज्य असणाऱ्या आसाममध्ये भाजपनं सत्ता राखण्यत यश मिळवलं आहे. भाजपप्रणित एनडीएनं 79 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसप्रणित आघाडीनं 46 जागांवर आघाडी मिळवलीयय. तर इतर 1 जण आघाडीवर आहे.

Tamil nadu Election Live Update:तामिळनाडूमध्ये द्रमुक मित्रपक्ष 154 जागांवर पुढे,

मतमोजणीच्या आकडेवारीनुसार द्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 154 जागांवर पुढे आहे. अण्णाद्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 79, इतर 1 जागांवर आघाडीवर आहेत. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाच करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे. द्रमुककडून एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात.

Kerala Election Result:केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटनं सत्ता राखली

केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 90 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 90 तर काँग्रेस आघाडीला 44 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 1 आणि इतरांना 5 जागांवर आघाडी मिळाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. पण, ही वेळ विजय साजरा करण्याची नाही. आपल्याला कोरोना विरुद्ध लढायचं आहे, असं विजयन म्हणाले. मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना केरळमध्ये पराभावाला सामोरं जावं लागलं आहे. ते भाजपकडून निवडणूक लढवत होते. काँग्रेस उमदेवारानं त्यांचा पराभव केला.

Puducherry Election 2021 Result Updates: पुद्दुचेरीमध्ये एनडीए आघाडीवर

पुद्दुचेरीमध्ये 30 जागांपैकी 14 एन.आर.काँग्रेस आणि भाजप आघाडी 14 जागांवर पुढे आहे. तर, काँग्रेस 10 आणि इतर 5 जागांवर पुढे आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2021 07:32 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

    नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

  • 02 May 2021 07:15 PM (IST)

    बंगालमध्ये जे चाललंय तो रडीचा डाव, शरद पवारांचं टीकास्त्र

    बंगालमध्ये जे चाललंय तो रडीचा डाव, शरद पवारांचं टीकास्त्र

  • 02 May 2021 06:21 PM (IST)

    Mamata Banerjee Defeated: नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी

    तृणमूल काँग्रेस 209 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 82 तर इतर 2 जण आघाडीवर आहेत. देशाचं लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममधून भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला आहे.

  • 02 May 2021 06:02 PM (IST)

    केरळच्या जनतेने सत्ता दिली, पण विजय साजरा करायची वेळ नाही: पिनराई विजयन

    केरळच्या जनतेने सत्ता दिली, पण विजय साजरा करायची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली.

  • 02 May 2021 05:16 PM (IST)

    ममता जिंकल्या! आता कोरोनाकडं लक्ष देऊया :उद्धव ठाकरे

    ममता जिंकल्या! आता कोरोनाकडं लक्ष देऊया : उद्धव ठाकरे

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या, आता कोरोनाकडं लक्ष देऊया , अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले,

    ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया

    : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि शिवसेना पक्षप्रमुख

  • 02 May 2021 05:09 PM (IST)

    West Bengal result live : ममता बॅनर्जींनी बंगालच्या जनतेचे मानले आभार

    संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या नंदिग्राममधून ममता बॅनर्जींनी विजय मिळवला. भाजप नेते सुवेंदू अधिकारी याचा त्यांनी पराभव केला. टीएमसी 208, भाजप 81 जागा, काँग्रेस 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 04:52 PM (IST)

    Assam counting latest Update : भाजपला आसाममध्ये पुन्हा सत्ता

    पूर्वेकडील महत्वाचं राज्य असणाऱ्या आसाममध्ये भाजप पुन्हा सत्ता मिळवली आहे. भाजप प्रणित एनडीए 79 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आघाडीला 45 जागा मिळातील, असा अंदाज आहे.

  • 02 May 2021 04:51 PM (IST)

    Kerala Election Result Live: केरळ डाव्या पक्षांची पुन्हा सत्ता, एलडीएफ 86 जागावंर आघाडीवर

    Kerala Election Result Live: केरळ डाव्या पक्षांची पुन्हा सत्ता, एलडीएफ 86 जागावंर आघाडीवर

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात एलडीएफनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 86 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 86 तर काँग्रेस आघाडीला 45 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 4 आणि इतर 5 जागेवर आघाडीवर आहेत.

  • 02 May 2021 04:44 PM (IST)

    TamilNadu Counting Result Live : तामिळनाडूमध्ये द्रमुक मित्रपक्ष 152 जागांवर पुढे

    मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार द्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 152 जागांवर पुढे आहे. अण्णाद्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 81, इतर14 जागांवर आघाडीवर आहेत. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे.

  • 02 May 2021 04:29 PM (IST)

    West Bengal Mamata Banerjee result live: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये मैदान मारलं आहे. एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांचा त्यांनी जवळपास 3727 मतांनी पराभव केला आहे. पश्चिम बंगालच्या विजयाबद्दल अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे.

  • 02 May 2021 04:20 PM (IST)

    ममता दीदी अखेर जिंकल्या, नंंदीग्रामच्या जागेवर अटीतटीच्या लढतीत 3 हजार 727 मतांनी विजय

    नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या आहेत. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकापरी यांचा पराभव झाला आहे. नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची होती. अखेर या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा विजय झाला. ममता यांचा 3 हजार 727 मतांनी विजय झाला आहे.

  • 02 May 2021 04:10 PM (IST)

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्टॅलिन यांचं अभिनंदन

    तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वात डीएमकेनं विजय मिळवल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यानं त्यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टॅलिन यांचं ट्विटद्वारे अभिनंदन केलं आहे.

  • 02 May 2021 04:08 PM (IST)

    Assam counting latest Update : भाजप आसाममध्ये आघाडीवर, कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

    Assam counting latest Update : भाजप आसाममध्ये आघाडीवर, कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

    पूर्वेकडील महत्वाचं राज्य असणाऱ्या आसाममध्ये भाजप पुन्हा सत्ता मिळवेल, अशी चिन्ह आहेत. सत्ता येणार असल्यानं कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव सुरु केला आहे. भाजपनं इथल्या निवडणुका सर्वानंद सोनेवाल यांच्या नेतृत्वात लढवल्या.

  • 02 May 2021 04:06 PM (IST)

    शेवट्या फेरीत ममता बॅनर्जी आघाडीवर, 820 मतांनी दीदी आघाडीवर

    सोळ्या फेरी अखेरिस ममता बॅनर्जी आघाडीवर, नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी पुन्हा आघाडीवर आल्या आहेत. सध्या त्या 820 मतांनी आघाडीवर आहेत. नंदीग्रामच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

  • 02 May 2021 04:05 PM (IST)

    West Bengal result live :नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी 16 फेरीनंतर आघाडीवर

    संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या नंदिग्राममधून ममता बॅनर्जी 16 व्या फेरीनंतर 820 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना कडवी लढत दिली आहे.

  • 02 May 2021 04:03 PM (IST)

    'पक्षाने निराशा व्यक्त करण्यापेक्षा सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे', संजय निरुपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर

    "पाच राज्यांच्या निवडणुकीचा जो निकाल आला आहेत ते काँग्रेससाठी अतिशय निराशाजनक आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून आमच्याकडे पूर्णकालीन अध्यक्ष नाही. या निवडणुकीच्या निकालावर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा ज्या चुका झाल्या आहेत त्यांच्यात सुधारणा करण्यावर भर दिला पाहिजे", असं मत संजय निरुपम यांनी मांडलं.

  • 02 May 2021 03:51 PM (IST)

    कोरोना महामारीत उत्साह साजरा करु नका, DMK प्रमुख स्टालिन यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

    तामिळनाडूत DMK पक्षाचा विजय आता जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरुन उत्साहात आनंद साजरा करु लागले आहेत. मात्र, देशावर सध्या कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत DMK प्रमुख स्टालिन यांनी कार्यकर्त्यांना उत्साह साजरा न करण्यातं आवाहन केलं आहे.

  • 02 May 2021 03:42 PM (IST)

    West Bengal result live :नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी 6 मतांनी पिछाडीवर

    West Bengal result live :नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी 6 मतांनी पिछाडीवर

    संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या नंदिग्राममधून ममता बॅनर्जी 6 मतांनी पिछाडीवर आहेत. सुवेंदू अधिकारी यांना अवघ्या 6 मतांची आघाडी आहे.

  • 02 May 2021 03:37 PM (IST)

    ममता बॅनर्जी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

    पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील विजयाबाबत ममता बॅनर्जी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • 02 May 2021 03:31 PM (IST)

    Assembly Election Results 2021:आतापर्यंतच्या मतमोजणीचं चित्र काय?

    आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये सत्ता मिळेल, असं चित्र आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी हॅट्रिक करतील. तामिळनाडूमध्ये द्रमुक सत्ता मिळवेल. तर केरळमध्ये डावे पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येतील.

  • 02 May 2021 03:10 PM (IST)

    TamilNadu Counting Live Update:तामिळनाडूमध्ये द्रमुक 10 वर्षानंतर सत्ता मिळवणार

    मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार द्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 140 जागा, अण्णाद्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 90, इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे.

  • 02 May 2021 02:31 PM (IST)

    Puducherry Election 2021 Result Updates: पुद्दुचेरीमध्य़े 4 जागांचा निकाल जाहीर

    पुद्दुचेरीमध्ये 30 जागांपैकी 4 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये डीएमके 1, बीजेपी 1 आणि एन.आर.काँग्रेसनं 2 जागांवर विजय मिळवला आहे.

  • 02 May 2021 02:23 PM (IST)

    Kerala Election Result Live: निवडणुका एकत्र जिंकल्या, कोरोनाविरुद्धची लढाई एकत्र जिंकू

    निवडणुका एकत्र जिंकल्या, कोरोनाविरुद्धची लढाई एकत्र जिंकू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं अभिनंदन केलं आहे.

  • 02 May 2021 02:20 PM (IST)

    Kerala Election Result Live: केरळ डाव्या पक्षांची पुन्हा सत्ता, एलडीएफ 89 जागावंर आघाडीवर

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात एलडीएफ पुन्हा सत्तेत येणार आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 89 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 89 तर काँग्रेस आघाडीला 45 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 3 आणि इतर 3 जागेवर आघाडीवर आहेत.

  • 02 May 2021 02:13 PM (IST)

    TamilNadu Counting Live Update:तामिळनाडू द्रमुक एकहाती सत्ता मिळवणार

    मतमोजणीच्या सध्या आकडेवारीनुसार द्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 135, अण्णाद्रमुक आणि मित्रपक्षांची आघाडी 95, इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे. द्रमुककडून एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात.

  • 02 May 2021 02:10 PM (IST)

    Puducherry Election Result: पुद्दुचेरीमध्ये सत्तांतर होणार, युपीए 11 तर एनडीए 17 जागांवर आघाडीवर

    पुद्दुचेरीमध्ये यूपीए 11 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीए 17 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 02:01 PM (IST)

    Tamilnadu Result latest Update: शरद पवारांकडून स्टॅलिन यांचं अभिनंदन

    Tamilnadu Result latest Update: शरद पवारांकडून स्टॅलिन यांचं अभिनंदन

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांचे अभिनंदन केलं आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्यांची सेवा करण्यासाठी शुभेच्छा, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

  • 02 May 2021 01:33 PM (IST)

    बंगालमधील विजयाबद्दल शरद पवारांकडून ममतादीदींचं अभिनंदन

    बंगालमधील विजयाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचंं अभिनंदन केलं आहे.  या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • 02 May 2021 01:15 PM (IST)

    Nandigram election result: अखेर ममता बॅनर्जी नंदीग्रामधून आघाडीवर

    अखेर नंदीग्रामधून ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांना मागे टाकलं आहे. सध्या त्या आघाडीवर आहेत. 1117 मतांनी त्या आघाडीवर आहेत.

  • 02 May 2021 01:07 PM (IST)

    Tamilnadu Result latest Update: तामिळनाडूमध्ये द्रमुकला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता

    तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष 118 तर अण्णा द्रमुक 80 जागांवर आघाडीवर आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर द्रमुक एकहाती सत्ता स्थापन करु शकते. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे.

  • 02 May 2021 01:01 PM (IST)

    Tamilnadu Result latest Update: तामिळनाडूमध्ये द्रमुक 118 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष 118 तर अण्णा द्रमुक 80 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. सध्या द्रमुक 118, अण्णाद्रमुक 80, काँग्रेस 12 आणि भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे. द्रमुककडून एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात.

  • 02 May 2021 12:20 PM (IST)

    West bengal election result: शिवपूरमधून क्रिकेटर मनोज तिवारी 13 हजार मतांनी आघाडीवर

    शिवपूरच्या पीचवर क्रिकेटपटू मनोज तिवारीला भक्कम लीड मिळालंय. मनोज तिवारी सध्या 13000 मतांनी आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 11:55 AM (IST)

    Tamilnadu Result latest Live: कमल हसन आणि काँग्रेसच्या मयुरा जयकुमार यांच्यात कांटे की टक्कर

    Tamilnadu Result latest Live: कमल हसन आणि काँग्रेसच्या मयुरा जयकुमार यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

  • 02 May 2021 11:49 AM (IST)

    West Bengal result live : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 199 जागांवर आघाडीवर

    संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसनं 199 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप 89 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 11:44 AM (IST)

    Tamilnadu Result latest Update: तामिळनाडूमध्ये द्रमुक कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव सुरु

    निवडणूक निकालातील सुरुवातीच्या कलांनुसार द्रमुक आघाडीवर असल्यानं कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. द्रमुक 10 वर्षानंतर सत्तेत परतणार आहे.

  • 02 May 2021 11:33 AM (IST)

    Tamilnadu Result latest Update: तामिळनाडूमध्ये द्रमुक 135 जागांवर आघाडीवर, तर अण्णा द्रमुकला 98 जागावंर आघाडी

    तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष 135 तर अण्णा द्रमुक 98 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे. द्रमुककडून एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात.

  • 02 May 2021 11:27 AM (IST)

    Tamilnadu Result Live: द्रमुकचे एम. के. स्टॅलिन आघाडीवर, निवडणूक आयोगाची माहिती

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन कोथलूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

  • 02 May 2021 11:13 AM (IST)

    Tamilnadu counting latest Update: तामिळनाडूमध्ये द्रमुकची आघाडी: निवडणूक आयोग

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार द्रमुक पक्ष 98 तर अण्णा द्रमुक 81 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे.

  • 02 May 2021 11:13 AM (IST)

    West bengal election result : क्रिकेटर अशोक डिंडा पिछाडीवर, मनोज तिवारी आघाडीवर

    भाजपतर्फे निवडणूक लढवणारा क्रिकेटपटू अशोक दिंडा सध्या पिछाडीवर आहे. तो मोयना या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे क्रिकेटपटू मनोज तिवारी आघाडीवर आहे. तो टीएमसीच्या तिकिटावर शिबपूर जागेवरुन निवडणूक लढवत आहे.

  • 02 May 2021 11:10 AM (IST)

    Assam election 2021 : एनडीएची गाडी सुस्साट, हेमंत बिस्व यांना आघाडी

    भाजपा एनडीए युती 59 जागांवर पुढे आहे. त्याचबरोबर यूपीए 26 जागांवर आघाडीवर आहे. 'ईशान्येकडील अमित शाह' म्हणून ओळखले जाणारे हेमंत बिस्वा सरमाही सतत आघाडी आहेत. जल्लुकबारी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक ते लढवित आहेत. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. यापैकी आठ अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

  • 02 May 2021 11:09 AM (IST)

    Kerala Election Result live upadates : केरळ डावे पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता, एलडीएफ 91 जागावंर आघाडीवर

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आरोग्यमंत्री शैलजा या आघाडीवर आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 91 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 91 तर काँग्रेस आघाडीला 46 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 2 जागेवर आघाडीवर आहे आणि इतर1 जण आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 11:04 AM (IST)

    Puducherry Election Result: युपीए 03 तर एनडीए 10 जागांवर आघाडीवर

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पुदुचेरीमध्ये यूपीए 3 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीए 10 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 11:02 AM (IST)

    Tamilnadu Election Result Live: अभिनेते कमल हसन आघाडीवर

    दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आघाडीवर आहेत. द्रमुक पक्ष 133 तर अण्णा द्रमुक 100 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे.

  • 02 May 2021 10:51 AM (IST)

    Puducherry Election Result Live: पुदुचेरीमध्ये काँग्रेसची 1 आणि भाजपची 2 जागांवर आघाडी: निवडणूक आयोग

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पुदुचेरीमध्ये भाजप 2 जागेवर तर काँग्रेस 1 जागांवर आघाडीवर आहे. तर, ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 10:46 AM (IST)

    Tamilnadu Election Result: ECI कडून तामिळनाडूमधील 184 जागांचे कल जाहीर , द्रमुक 86 जागांवर आघाडीवर

    दक्षिणेकडील महत्वाचं राज्य तामिळनाडूचे कल निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत. 184 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 86 तर सत्ताधारी अण्णा द्रमुक 72 जागेवर आघाडीवर आहे. भाजप 3 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय.

  • 02 May 2021 10:25 AM (IST)

    Mamta banerjee vs Suvendu adhikari: ममता बॅनर्जी 7 हजार मतांनी पिछाडीवर

    बंगालच्या बहुचर्चित नंदीग्राम विधानसभा जागेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसलाय. तिसऱ्या फेरीअंती त्या 7 हजार मतांनी पिछाडीवर पडलेल्या आहेत. सध्या टीएमसी 149, भाजप 118, संयुक्त मोर्चा 5 तर अन्य 2 असा जागांचा कल आहे.

  • 02 May 2021 10:24 AM (IST)

    Puducherry Election Result Live: ECI नुसार पुदुचेरीमध्ये काँग्रेस 3 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर

    निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस तीन जागांवर आणि भाजप आघाडी 2 जागांवर पुढे आहेत.

  • 02 May 2021 10:19 AM (IST)

    Kerala Election Result live updates : केरळ डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आरोग्यमंत्री शैलजा या आघाडीवर आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 78 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 78 तर काँग्रेस आघाडीला 60 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 2 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 10:17 AM (IST)

    Tamilnadu Election Result live: तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आघाडीवर

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे नेते ई. के. पलानीस्वामी हे इडापडी जागेवर आघाडीवर आहेत. 205 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 117 तर अण्णा द्रमुक 88 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे.

  • 02 May 2021 10:09 AM (IST)

    Kerala Election Result Update : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आघाडीवर

    केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री पिनराई विजयन 8434 मतं मिळवून आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमदेवार सी रघूनाथ यांना 5083 मतं आहेत. पिनराई विजयन हे धर्मादाम (Dharmadmam) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • 02 May 2021 10:05 AM (IST)

    Kerala Election Result live : केरळ डावे पक्ष सत्ता राखणार?, 78 जागांवर आघाडीवर

    केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 78 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 78 तर काँग्रेस आघाडीला 60 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 2 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 10:03 AM (IST)

    West bengal election result : ममता बॅनर्जी पिछाडीवर, कलांनुसार तृणमूलला बहुमत

    नंदीग्रामच्या जागेवर सुरुवातीच्या कलांनुसार ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. म्हणजे भाजपाचे सुभेंदु अधिकारी आघाडीवर आहेत. मात्र असं असलं तरी बंगालमध्ये तृणमूलला सत्ता मिळेल, असा अंदाज आहे. कारण तिथे तृणमूलचे 151 उमेदवार सध्या आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 10:03 AM (IST)

    Tamilnadu Election Result: तामिळनाडूमधील 205 जागांचे कल हाती, द्रमुक 117 जागांवर आघाडीवर

    दक्षिणेकडील महत्वाचं राज्य तामिळनाडूमधील 205 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 117 तर अण्णा द्रमुक 88 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय.

  • 02 May 2021 10:00 AM (IST)

    Tamilnadu Election Result live: द्रमुकचे एम. के. स्टॅलिन कोलथूर मतदारसंघातून आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 117 तर अण्णा द्रमुक 88 जागेवर आघाडीवर आहे. द्रमुकचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एम. के. स्टॅलिन कोलथूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

  • 02 May 2021 09:50 AM (IST)

    Puducherry Election Result Update: पुदुचेरीमध्ये काँग्रेस आणि भाजप आघाडीमध्ये काटें की टक्कर

    पुदुचेरीमध्ये भाजप 8 जागेवर तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 09:45 AM (IST)

    Puducherry Election Result Update: पुदुचेरीमध्ये काँग्रेस आणि भाजप आघाडीमध्ये काटें की टक्कर

    पुदुचेरीमध्ये भाजप 5 जागेवर तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 09:43 AM (IST)

    Kerala Election Result Update : केरळ डावे पक्ष सत्ता राखणार, 80 जागांवर आघाडीवर

    केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 80 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांना 80 तर काँग्रेस आघाडीला 60 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 2 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 09:38 AM (IST)

    Assam election 2021 : आसाममध्ये एनडीए आघाडीवर

    आसाममध्ये ताज्या कलानुसार एनडीए 29 आणि युपीए 14 जागांवर आघाडीवर आहेत. यासह, सीएम सर्बानंद सोनोवाल आता माजुलीत आघाडीवर गेले आहेत. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. यापैकी आठ अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

  • 02 May 2021 09:19 AM (IST)

    Tamilnadu Election Result Live Update : तामिळनाडूमध्ये द्रमुक 75 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 75 तर अण्णा द्रमुक 54 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय.

  • 02 May 2021 09:16 AM (IST)

    Tamilnadu Election Result Live : तामिळनाडूमध्ये द्रमुक 69 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 69 तर अण्णा द्रमुक 48 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 02 May 2021 09:12 AM (IST)

    Kerala Election Result Update : निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार केरळ डावे पक्ष 1 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर

    केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार डावे एका आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 09:09 AM (IST)

    Tamilnadu Election Result Update : तामिळनाडूमध्ये द्रमुक 55 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 55 तर अण्णा द्रमुक 35 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 02 May 2021 09:08 AM (IST)

    Kerala Election Result Live : केरळडावे पक्ष सत्ता राखणार, 81 जागांवर आघाडीवर

    Kerala Election Result Live :  केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 81 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार डाव्या पक्षांना 81 तर काँग्रेस आघाडीला 57 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 2 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 09:07 AM (IST)

    Assam election 2021: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल पिछाडीवर

    आसाममध्ये मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल सध्या टपाल मतपत्रिकेत पिछाडीवर आहेत. ते माजोली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय एनडीए सध्या 17, यूपीएच्या 12 जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. यापैकी आठ अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

  • 02 May 2021 09:04 AM (IST)

    Puducherry Election Result Live: पुदुचेरीमध्ये काँग्रेस आणि भाजप आघाडीमध्ये काटें की टक्कर

    पुदुचेरीमध्ये भाजप 4 जागेवर तर काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 08:55 AM (IST)

    Tamilnadu Election Result Update : तामिळनाडूमध्ये द्रमुक 20 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 20 तर अण्णा द्रमुक 5 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 02 May 2021 08:53 AM (IST)

    Kerala Election Result Update : केरळमधील 138 जागांचे कल हाती, डावे पक्ष सत्ता राखणार

    Kerala Election Result Update :  केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांपैकी 79 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार डाव्या पक्षांना 79 तर काँग्रेस आघाडीला 58 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 1 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 08:48 AM (IST)

    West bengal election result: केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आघाडीवर

    टोलीजंगमधून भाजप उमेदवार तसंच केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आघाडीवर आहेत. तसंच बेहला पश्चिममधून तृणमूल उमेदवार पार्थ चॅटर्जी पिछाडीवर आहेत.

  • 02 May 2021 08:41 AM (IST)

    Tamilnadu Election Result Live : तामिळनाडूमध्ये द्रमुक 16 जागांवर आघाडीवर

    Tamilnadu Election Result Live :  तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 16 तर अण्णा द्रमुक 3 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे.

  • 02 May 2021 08:40 AM (IST)

    Puducherry Election Result Live: पुदुचेरीमध्ये काँग्रेस आघाडीवर

    पुदुचेरीमध्ये भाजप 1 जागेवर तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 08:38 AM (IST)

    Tamilnadu Election Result Live : तामिळनाडूमध्ये द्रमुक 15 जागांवर आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष आघाडीवर असल्याची माहिती आहे. द्रमुक 15 तर अण्णा द्रमुक 3 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे.

  • 02 May 2021 08:37 AM (IST)

    Assam election 2021: आसाममध्ये 3 जागांवर यूपीए आघाडीवर

    आसाममधून आणखी काही कल हाती आले आहेत. टपाल मतपत्रिकेच्या या कलामध्ये यूपीए तीन जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर एनडीए देखील तीन जागांवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 08:37 AM (IST)

    Kerala Election Result Live : केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर

    Kerala Election Result Live : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळतेय. सुरुवातीच्या कलांनुसार डाव्या पक्षांना 48 तर काँग्रेस आघाडीला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एनडीए 1 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 08:36 AM (IST)

    West bengal election result: बंगालमध्ये 33 जागांवर तृणमूल आघाडीवर

    बंगालमधील बॅलेट पेपरच्या ताज्या कलानुसार, टीएमसी 33 आणि भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे. अलिपुरद्वार, दिनहाटा, कुमारग्राम, कलाचिनी, मदारिहाटमध्ये भाजप आघाडीवर. बंगालमधील एकूण 58 जागांचे सुरुवातीचे कल सध्या हाती आले आहे.

  • 02 May 2021 08:32 AM (IST)

    Tamilnadu Election Result Live : तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष आघाडीवर असल्याची माहिती आहे. द्रमुक 4 तर अण्णा द्रमुक 1 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे.

  • 02 May 2021 08:29 AM (IST)

    Puducherry Election Result: पुदुचेरीमध्ये भाजप आघाडीवर

    Puducherry Election Result: पुदुचेरीमध्ये भाजप 4 जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

  • 02 May 2021 08:26 AM (IST)

    Tamilnadu Election Result: तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर

    तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष आघाडीवर असल्याची माहिती आहे. द्रमुक 4 तर अण्णा द्रमुक 1 जागेवर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 08:25 AM (IST)

    Kerala Election Result: केरळमध्ये डाव्या पक्षांची आघाडी

    Kerala Election Result: केरळ मध्ये डाव्या पक्षांनी आघाडी घेतली असून लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट 4 जागावंर आघाडीवर आहे.

  • 02 May 2021 08:15 AM (IST)

    West Bengal election result : पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरु, बंगालमध्ये 6 जागांवर भाजपा पुढे

    पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरु झाली आहे, बंगालमध्ये 6 जागांवर भाजपा पुढे आहे. पहिल्यांदा टपाल मतपत्रिकेची मोजणी केली जाईल. यानंतर ईव्हीएममधील मतं मोजली जातील.

  • 02 May 2021 08:13 AM (IST)

    Election Results 2021 : 5 राज्यांतल्या मतमोजणीला सुरुवात

    पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा टपाल मतपत्रिकेची मोजणी केली जाईल. यानंतर ईव्हीएममधील मतं मोजली जातील.

  • 02 May 2021 07:47 AM (IST)

    कुणीही जिंकू हारु, महत्त्वाचं नाही, शेवटी जीव महत्त्वाचा- काँग्रेस नेते कपील सिब्बल

    आज निवडणुकीच्या निकालाच्या दिवस आहे. मतमोजणी होईल. पण या निवडणुकीत कोणालाही विजय मिळाला आणि पराभव सहन करावा लागला तरी काही महत्त्वाचं नाही. आज लोकांचे प्राण वाचवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी दिली आहे.

  • 02 May 2021 07:44 AM (IST)

    West Bengal election result : बंगालमध्ये तृणमूल उमेदवाराकडून तक्रार दाखल, मतमोजणीआधीच गोंधळाला सुरुवात

    बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मी जेव्हा मतमोजणी केंद्रावर आलो त्यावेळी स्ट्रॉंग रूम उघडी होती, असा आरोप टीएमसीचे उमेदवार सोवोंदेव चट्टोपाध्याय यांनी केला आहे. त्यांनी आरओकडे तक्रार केली आहे. मतमोजणीपूर्वी स्ट्रांग रूम उघडणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

  • 02 May 2021 07:28 AM (IST)

    Election Results 2021: मतदान केंद्रांवर कोरोना नियमांचं पालन बंधनकारक

    आसामच्या 126 जागांवर मतदान झाले असून, तिथेही निकाल जाहीर होणार आहेत. तिथे मतमोजणीची तयारी सुरु आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभू्मीवर सर्व खबरदारी घेतली जात आहे. कोरोना नियमांचं पालन करणं निवडणूक आयोगाने बंधनकारक केलं आहे.

  • 02 May 2021 07:25 AM (IST)

    kerala Election Results: केरळात पुन्हा डाव्यांचं वर्चस्व?, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

    केरळमधील मतदान केंद्रावर लगबग पाहायला मिळतीये. मतमोजणीसंबंधीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. अगदी पुढच्या अर्ध्या तासांत मतमोजणीला सुरुवात होईल.

  • 02 May 2021 07:23 AM (IST)

    Vidhan Sabha Election Results 2021: 5 राज्यांत 822 जागांसाठी मतमोजणी

    पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीसह पाच राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशातील 822 विधानसभा जागांसाठी रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी पार पडत आहे. यावेळी, कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती निवडणूक आयोगाने केली आहे.

  • 02 May 2021 07:20 AM (IST)

    Puducherry Election Result : पुद्दुचेरीमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण

    पुद्दुचेरीच्या 30 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. मतमोजणी केंद्रांवर त्यासंबंधीची लगबग सुरु झाली आहे. संवेदनशील मतमोजणी केंद्रावरपोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 02 May 2021 07:17 AM (IST)

    Tamil Nadu Election Results : तामिळनाडूमध्ये मतमोजणीची तयारी सुरु

    सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. यासाठी तयारी सुरु झाली आहे. चेन्नईमधील मतदान केंद्राबाहेरचे लगबग पाहायला मिळत आहे. तिथे मतमोजणीसंबंधीची सगळी तयारी झाली आहे. तामिळनाडूमधील 234 जागांवर मतमोजणी होत आहे.

  • 02 May 2021 07:14 AM (IST)

    5 state assembly election results 2021: 8 वाजता मतमोजणीला सुरुवात

    5 राज्यांतील मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल. यामध्ये बंगालमधील 292 जागा, आसाममध्ये 126 जागा, केरळमध्ये 140 जागा, तामिळनाडूमध्ये 244 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांचा निकाल लागणार आहे.

  • 02 May 2021 07:11 AM (IST)

    बंगालसह पाच राज्यांत गुलाल कोण उधळणार?

    assembly election results 2021: पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचा निकाल आज स्पष्ट होईल. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या.

Published On - May 02,2021 7:33 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.