यवतमाळमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा गळा चिरुन खून; भ्रष्टाचाराविरोधात देत होते लढा; मंदिराजवळ आढळला मृतदेह

| Updated on: May 16, 2022 | 4:56 PM

पारवा गावातील महादेव मंदिराजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला आहे. पारवाचे माजी आमदार राजू तोडसाम घटनास्थळी दाखल झाले आहेत.

यवतमाळमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा गळा चिरुन खून; भ्रष्टाचाराविरोधात देत होते लढा; मंदिराजवळ आढळला मृतदेह
राष्ट्रवादी कार्यकर्त्याची यवतमाळमध्ये हत्या
Follow us on

यवतमाळ: राष्ट्रवादी काँग्रेसचा पारवा (Parawa) येथील कार्यकर्ता अनिल ओच्यावार (Anil Ochyawar) यांची गळा चिरुन निर्घृण हत्या () झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पारवा सर्कलमध्ये सामाजिक कार्यासह, भ्रष्टाचार विरोधात अनिल ओच्यावर हे लढा देत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (National Congress Party Leader) ही हत्या झाल्याचे समजताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पारवा गावातील महादेव मंदिराजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला आहे.

अनिल ओच्यावर यांची हत्या झाल्याचे समजताच पारवाचे माजी आमदार राजू तोडसाम घटनास्थळी दाखल झाले. या हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

भ्रष्टाचार विरोधात लढा

अनिल ओच्यावार यांची यवताळ जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यासह, भ्रष्टाचार विरोधात लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळख होती. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे समजताच राष्ट्रवादीसह सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा जबर धक्का बसला आहे.

सामाजिक कार्यात सक्रीय

सामाजिक कार्यात ते सक्रिय असल्यामुळेही त्यांचे अनेक नेते आणि सामाजिक चळवळीत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र त्यांची हत्या झाल्यामुळे कार्यकर्त्यांनीही त्यांच्या हत्येची तात्काळ चौकशी करुन आरोपींनी ताबोडतोब अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

महादेव मंदिराजवळ मृतदेह

पारवा गावातील महादेव मंदिराजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसराची पाहणी करुन या हत्येसंदर्भात काही धागेदोऱे मिळतात का त्याची तपासणी करत आहेत. मोबाईलही त्यांचा ताब्यात घेतला असून त्यावरुन पोलीस चौकशी करत आहेत.