Kharif Season : हवामान विभागाचे शुभसंकेत, खरिपाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना काय सल्ला ?

नियमित कर्ज अदा कऱणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने सत्ता स्थापनेच्या दरम्यान केलेल्या कर्जामाफी वेळी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मध्यंतरी तिजोरीत खडखडाट होता तर पुन्हा राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले होते. त्यामुळे ही रक्कम देणे शक्य झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

Kharif Season : हवामान विभागाचे शुभसंकेत, खरिपाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना काय सल्ला ?
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 4:53 PM

मुंबई : गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील उत्पादन घटले होते. यंदा हंगाम सुरु होण्यापूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने शुभसंकेत दिले आहेत. (Monsoon) मान्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याने उत्पादनात वाढ होईल शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही. त्यामुळे पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकणे गरजेचे असल्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार तर प्रयत्नशील राहणारच आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही कुठेही कमी न पडता उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रोत्साहनपर रकमेचा पुन्नरउच्चार

नियमित कर्ज अदा कऱणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने सत्ता स्थापनेच्या दरम्यान केलेल्या कर्जामाफी वेळी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मध्यंतरी तिजोरीत खडखडाट होता तर पुन्हा राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले होते. त्यामुळे ही रक्कम देणे शक्य झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. मध्यंतरी अर्थसंकल्पीय अधिवनेशनात ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरीत देण्याची घोषणा त्यांनी केली होती मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार रकमेतून प्रोत्साहनच मिळालेले नाही.

तब्बल 10 वर्ष कृषी प्रशिक्षण संस्था इमारतीचे काम

प्रादेशिक कृषी प्रशिक्षण संस्थेचे काम तब्बल 10 वर्षापासून सुर आहे. 10 वर्ष काम रेंगाळणे म्हणजे हा आमचा अपमान असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये सातत्य राहिले तरी दर्जाही टिकवता येतो. आता अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु

राज्याचे राजकारण हे खालच्या पातळीवर आले आहे. यामुळे सामाजिक सलोखा टिकून राहतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही पण काही जणांकडून तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जे राज्यासाठी धोक्याचे आहे. राजकीय स्वार्थासाठी कोणत्या पातळीवर जावे यासाठीही काही मर्यादा आहेत. केवळ एखादा मुद्दा घेऊन शांतता भंग केली जात आहे. जनतेचे प्रश्न, विकासाचे राजकारण करण्याची खरी गरज असताना वेगळेच मुद्दे घेऊन जनतेचे लक्ष विचलीत केले जात असल्याचे सांगत अजित पवार यांनी विरोधकांवर टिका केली.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.