Neha Bora CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांचं संताप आणणारं कृत्य; नेहा बोराला पकडताना पोलिसाचा लाजीरवाणा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल
Neha Bora CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांचं संताप आणणारं कृत्य समोर आलं आहे. पुरुष पोलिसाने नेहा बोरा हिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Neha Bora CJP Protest Delhi: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कथित मतचोरीच्या आरोपावरून देशभरात वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात आधीच विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता आयोगाच्या विरोधात सीजेपी, डाव्या संघटना देखील उतरल्या आहेत. सीजेपीने काल दिल्लीत आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. त्यानंतरही कार्यकर्त्यांकडून जंतरमंतरवर कूच केली जात आहे. दिल्लीत आंदोलनासाठी डाव्या विद्यार्थी संघटनेच्या नेहा बोरा हिनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्लीत आंदोलनस्थळी जाताना नेहाला एका पुरुष पोलिसाने अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पुरुष पोलिसाच्या लाजीरवाण्या स्पर्शाने नेहाचा एकच संताप अनावर झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर दिल्ली पोलिसांचा 25 हजारांचा फौटफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर सीजेपीसह डाव्या संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. परंतु पोलिसांच्या कारवाईपुढे आंदोलकांचा निभाव लागला नाही. आता दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलक तरुणींना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.
डाव्या विचारांची AISA ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु तिला ताब्यात घेताना केलेल्या कारवाईवर टीका होऊ लागली आहे. दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिच्यासोबत लाजीरवाणे कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहा बोरा आणि तिचे सहकारी पोलिसांना चकवा देत पळत होते. त्यावेळी नेहाला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याचा हात तिच्या छातीला लागला. पोलिसाच्या कृत्याने नेहा बोरा चांगलीच भडकली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर या पोलिसाने ताबडतोब हात जोडून माफी मागितली. महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांना हात लावता येत नाही, असा नियम आहे. त्यानंतरही दिल्लीत पोलिसांकडून नियमाचा भंग होताना दिसत आहे.