Nitesh Rane : अभिजित दीपकेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान, झुरळांना…नितेश राणेंचा आरोप; माफी मागण्याची केली मागणी!
कॉकरोच जनता पार्टीच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिजीत दिपके यांच्यावर टीका केली आहे. दिपके यांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अवमान करणारा फोटो पोस्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : उद्या मुंबईत क्रॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन आहे. अभिजीत दीपकेवर हरकत नाही. पण ते ज्या उमर खालिदचे समर्थन करत आहेत. देशविरोधी ताकद त्यांच्या सोबत होते. पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा व आमच्या देवी देवतांना नावे ठेवली. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता व ओळख आहे, त्यांची बदनामी करण्यासाठी उद्याचे आंदोलन आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
अभिजित दिपकेने एक फोटो पोस्ट केला आहे. छत्रपतींच्या खाली मावळ्यांऐवजी क्रॉक्रोज दाखवले जात आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे
मुंबईत कुठलाही शिवप्रेमी व देशभक्त हे सहन करणार नाही. दुसऱ्या फोटोत महात्मा गांधींच्या पायाशी शिवाजी पार्क लिहिले आहे. चप्पलेजवळ महाराजांचे नाव लिहिले आहे. हे टिपू सुलतानचे समर्थकांचे आंदोलन आहे का, हे कुणीही सहन करणार नाही. अभिजित दिपके यांनी माफी मागावी. आम्ही हा अपमान सहन करणार नाही.
महाराष्ट्रात लोकशाही आहे, कुणीही घाबरत नाही. ही आंदोलनं पाकिस्तानमध्ये करून दाखवा, असं आव्हानही त्यांन दिलं आहे. हे कुणाचे समर्थक आहेत. उमर खालिदला आत का टाकले. तो शरियाचा समर्थक करत होता. त्याला मानणारे हे देशविरोधी लोकांना चालवत नाही ना. कालच मुख्यमंत्री यांनी सांगितलं, आंदोलन करायला कुणीही थांबवत नाही. मात्र नीटच्या निमित्ताने सर तन से जुदा नारे दिले देवी देवतांचा अपमान केला, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
नेमका हा अजेंडा काय?
आज छत्रपती शिवरायांचा अपमान केला. राजकारण बाजुला राहू द्या. छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप आहे ना. आमदार खासदार ही पदे बाजुला पाहू द्या. शिवरायांचा अपमान झाल्यावर दर हे पाठिंबा देत असतील तर कसले हे ठाकरेंचे वारसदार. कुणाल कामरा आपल्या सीतेमातेबाबत काय बोलला होता
त्याचे थोबाड का नाही फोडले, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.