आता समाजात स्थान असलेल्यांनाच राष्ट्रवादीत स्थान; जयंत पाटलांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 04, 2021 | 3:22 PM

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा आठवा दिवस असून संवाद दौरा यात्रा आज अमरावती येथे पोहोचली आहे. | Jayant Patil

आता समाजात स्थान असलेल्यांनाच राष्ट्रवादीत स्थान; जयंत पाटलांची मोठी घोषणा
कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेण्यासाठी, महाविकास आघाडीतील पक्षांशी ताळमेळ घालून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
Follow us on

अमरावती: समाजात स्थान असलेल्या लोकांना आपल्याला पक्षात स्थान द्यायचे आहे. हा धोरणात्मक बदल आपण करायला हवा. हे जर झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महाराष्ट्रात एक सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (NCP leader Jayant Patil in parivar Samvas yatra Amaravati)

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा आठवा दिवस असून संवाद दौरा यात्रा आज अमरावती येथे पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्व निघालो आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेण्यासाठी, महाविकास आघाडीतील पक्षांशी ताळमेळ घालून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पवारसाहेबांच्या विचारांनी असंख्य तरुण आज प्रभावित झालेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी विषयी आकर्षण निर्माण झाले आहे. या सर्व तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छताखाली आणत राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी आपण काम करायला पाहिजे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

…तर अमरावतीमध्ये परिस्थिती बदलू शकते: देशमुख

आपल्याला पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही सुचना केल्या ज्याचे पालन जर आपण केले तर अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढू शकते असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला. केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती मात्र तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने केले आहे अशी जोरदार टीकाही अनिल देशमुख यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अमरावतीत जास्त ताकद आहे. आपण जर योग्य निर्णय घेतले, थोडासा प्रयत्न केला तर इथे आपल्या तीन जागा निवडून येऊ शकतात. येत्या काळात आम्ही सर्व दुरुस्त्या करू आणि राष्ट्रवादी परिवार मोठा करू असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, संजय खोडके, माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का?; भुजबळांची हसता हसता ऑफर!

राष्ट्रवादीच्या ‘संवाद यात्रे’ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री कोण होणार? बातमी आली; थोरात, राऊत, वडेट्टीवारांच्या नावांची चर्चा सुरू?

जर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला काय?

(NCP leader Jayant Patil in parivar Samvas yatra Amaravati)