AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला काय?

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole resigns) यांनी राजीनामा दिल्याने, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. 

जर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला काय?
या सगळ्याविषयी काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ चांगली खाती पदरात पडणार असतील तरच काँग्रेसचे नेते या चर्चेला तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 04, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई : काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पदांची देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole resigns) यांनी राजीनामा दिल्याने, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे.  काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदामध्ये (Maharashtra Deputy Chief Minister) रस दाखवला आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरुन (Congress Maharashtra president) घासाघीस सुरु आहे. त्याचे पडसाद आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उमटताना दिसत आहेत. कारण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या (Congress) शर्यतीत आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदापेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे.   (If Congress gets the post of Deputy Chief Minister, Shiv Sena gets the post of Assembly Speaker, then what about NCP?)

नाना पटोलेच नाही तर काँग्रेसने देखील हे पद आपल्याकडून सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवं आहे. म्हणजेच विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्याला शिवसेनेने होकार दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. असं झालं तर दोन्ही पक्षांचं एकमत होईल, पण राष्ट्रवादीला काय मिळणार हा प्रश्न आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादीला काय?

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात ही पदांबाबत चर्चा होत असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्याच्या सरकारमधील तिन्ही पक्षांमधील दुवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे जे प्रस्ताव आहेत, ते राष्ट्रवादीला मान्य होतीलच असे नाही. राष्ट्रवादीही एखाद्या पदावर दावा सांगू शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.

राष्ट्रवादीकडे सध्या काय काय?

ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महत्त्वाची पदं आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा जास्त मंत्रिपदं राष्ट्रवादीकडे आहेत. खात्यांबाबतच बोलायचं झाल्यास, उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, जलसंपदा, गृहनिर्माण, सहकार, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य अशी तगडी मंत्रालयं राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादीकडे तब्बल 16 मंत्रालयं आहेत.

काँग्रेस आणि शिवसेनेकडे किती खाती?

ज्यावेळी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला, त्यावेळी राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. त्याआधी उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) अनिल देशमुख  – काटोल (नागपूर) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) राजेश टोपे – उदगीर (लातूर) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

यापूर्वी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

उपमुख्यमंत्रिपद देण्यास शिवसेना तयार?

काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली असली तरी त्याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत कोणी भाष्य केलेलं नाही. मात्र शिवसेनेने त्याला अनुकूलता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसने शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याला शिवसेनेने होकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसही या देवाण-घेवाणीत एखादं पद, महामंडळ किंवा अन्य काही पदरात पाडून घेईल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या  

महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी, काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार – राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री, पाहा संपूर्ण यादी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या