हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा छंद, अमरावतीत एक-दोन नव्हे 40 देशांच्या चलनांचा संग्रह

| Updated on: Aug 24, 2021 | 12:57 PM

कुणाला काय छंद लागेल हे काही सांगता येत नाही. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल व्यावसायिक अफसर शेख यांनी एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. ते जगातील विविध देशांचे चलन संग्रहीत करून आपल्या हॉटेल न्यु साईकृपाच्या दर्शनी भागात लावतात.

हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा छंद, अमरावतीत एक-दोन नव्हे 40 देशांच्या चलनांचा संग्रह
Follow us on

अमरावती : कुणाला काय छंद लागेल हे काही सांगता येत नाही. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल व्यावसायिक अफसर शेख यांनी एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. ते जगातील विविध देशांचे चलन संग्रहीत करून आपल्या हॉटेल न्यु साईकृपाच्या दर्शनी भागात लावतात. यामध्ये एक पैसा ते 1 लाख रूपयांच्या नोटांचा समावेश करण्यात आलाय. यात एक-दोन नव्हेत तर तब्बल 40 देशांच्या चलनाचा संग्रह आहे.

चलनातून बाद झालेली नाणी अथवा नोटांचे सुद्धा यामध्ये संकलन आहे. पर्यटक विविध देशांच्या चलनांची ही आगळीवेगळी नोट गॅलरी मोठ्या कुतूहलाने पाहताना दिसून येतात. न्यु साईकृपा हॉटेल येथे देशांतर्गत पर्यटक तसेच विदेशवारी करणाऱ्या पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे साहजिकच आपापल्या देशातील चलन हे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे असल्याने त्यांचा संग्रह करण्याचा छंद या हॉटेल व्यावसायिकाने जोपासला.

सुरुवातील देशातील बाद नाणी गोळा केली, आता 40 देशांची नाणी

सुरुवातीला ते आपल्याच देशातील व्यवहारातून बाद झालेले व नव्याने व्यवहारात चलनात आलेल्या नोटा व नाणी यांचा संग्रह करायचे. पुढे हे करता करता इतर देशांच्या चलनाविषयी आकर्षक व आवड निर्माण झाली. आज एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस देशांच्या चलनाच्या नोटा व नाणी या छंदवेड्या तरुणाने आपल्या कॅश काऊंटरवर सजवून ठेवले आहेत.

अमेरिकेचा डॉलरसह फ्रान्स-फ्रॅन्क, इटली-लीरासह कोणत्या देशांची नाणी?

अमेरिकेचा डॉलरसह फ्रान्स-फ्रॅन्क, इटली-लीरा, अर्जेंटिना-पेसो, इराक-दिनार, बांगलादेश-टका, अफगाणिस्तान-अफगाणी, चिन-युआन, रशिया-रुबल, ब्रम्हदेश-क्यार, श्रीलंका-रुपी, जपान-येन, दक्षिण आफ्रिका-रेंड, ब्राझील-रियाल, ब्रिटन-पौंड, कॅनडा-डॉलर, कोरीया-वॉन, पाकिस्तान-रुपया अशा एक ना अनेक जवळपास चाळीस देशांच्या चलनाचा संग्रह येथे पाहायला मिळतो.

हेही वाचा :

जर तुम्हाला रस्त्यात नाणे मिळाले तर करा हे काम, तुमचे भाग्य उजळेल

Photos: नाण्यांचं असे डिझाईन तयार केले की गुरुत्वाकर्षणही फेल, फोटो पाहून दंग व्हाल

माणुसकी जिंकली, कोरोना हरला! धोका पत्करुन चिमुरड्याच्या अन्ननलिकेतून नाणे काढले, केईएमच्या डॉक्टरांकडून जीवदान

व्हिडीओ पाहा :

Amravati Hotel owner collect currency coin of 40 countries nations