Photos: नाण्यांचं असे डिझाईन तयार केले की गुरुत्वाकर्षणही फेल, फोटो पाहून दंग व्हाल

तुम्हीही तुमच्या लहानपणी पैशांची नाणी जमा करणे, ते साठवणे आणि त्यासोबत खेळत काही आकार तयार करण्याचा प्रयत्न केला असेल. मात्र, या कामात निष्णात झालेल्या एका व्यक्तीने याच नाण्याचा वापर करुन सामान्य माणसाला अवाक करणारे आकार बनवले आहेत.

1/5

2/5
नाण्यांचे मनमोहक आकार बनवणारी ही व्यक्ती जपानी असून तिचं नाव तनु. ते नाण्यांना अचूकपणे ठेवत त्याचे वेगवेगळे आकार तयार करतात. ते माण्याचा वापर करुनच खाली बेस तयार करतात आणि मग एकावर एक नाणं ठेऊन हे सुंदर आकार तयार करतात. ते पाहून अनेकांना ते अशक्य वाटेल, मात्र हे खरं आहे.
3/5
या सुंदर कलाकृतींना पाहून तुम्हाला तुमचं बालपण आठवेल आणि पुन्हा एकदा या नाण्यांपासून हे आकार तयार करण्याची इच्छा होईल. यावेळी तुम्ही एका वेगळ्या उंचीवर जाऊन हे नाण्यांपासून वेगवेगळे आकार तयार कराल.
4/5
तनु नाण्यांना सरळ उभे करुन त्यांच्या पृष्ठभागावर त्यांना संतुलित करतात. नाण्यांच्या कडांचा अचूक वापर करुन पाहणाऱ्याला थक्क करणारे आकार तयार करतात.
5/5
तुम्ही नाण्यांचे हे भन्नाट आकार पाहिले तर तुम्हीही श्वास रोखून ते पाहत बसाल इतके सुरेख तयार केलेले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI