AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणुसकी जिंकली, कोरोना हरला! धोका पत्करुन चिमुरड्याच्या अन्ननलिकेतून नाणे काढले, केईएमच्या डॉक्टरांकडून जीवदान

शहापूरला राहणाऱ्या आठ वर्षांच्या प्रेम वानखेडे या मुलाने खेळताना एक रुपयाचे नाणे गिळले होते, केईएममधील डॉक्टर निलम साठे यांनी मोठा धोका पत्करुन तातडीने शस्त्रक्रिया केली (KEM Hospital ENT Surgeon perform endoscopic surgery on 8 year old boy to remove coin stuck in food pipe)

माणुसकी जिंकली, कोरोना हरला! धोका पत्करुन चिमुरड्याच्या अन्ननलिकेतून नाणे काढले, केईएमच्या डॉक्टरांकडून जीवदान
| Updated on: Jun 01, 2020 | 12:20 PM
Share

मुंबई : केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे शहापूरमधील चिमुरड्याला जीवदान मिळाले आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर निलम साठे यांनी शस्त्रक्रिया करत आठ वर्षांच्या मुलाने गिळलेले एक रुपयाचे नाणे अन्ननलिकेतून बाहेर काढले. ‘कोव्हीड’ संसर्गाचा धोका पत्करुन त्यांनी ही सर्जरी केली. (KEM Hospital ENT Surgeon perform endoscopic surgery on 8 year old boy to remove coin stuck in food pipe)

शहापूरला राहणाऱ्या आठ वर्षांच्या प्रेम वानखेडे या मुलाने खेळताना एक रुपयाचे नाणे गिळले होते. आई वडिलांनी सुरुवातीला त्याला परिसरातील राजीव गांधी मेडिकल हॉस्पिटल, आरजीएमसी मेडीकल हॉस्पिटल, शिवाजी हॉस्पिटलचे उंबरे झिजवले. मात्र एंडोस्कोप नसल्याचं कारण देत या रुग्णालयात त्याच्यावर ऑपरेशन करण्यास असमर्थता दाखवण्यात आली.

मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास अॅम्ब्युलन्सने वानखेडे कुटुंब शहापूरहून परेलमधील केईएम रुग्णालयात पोहोचलं. कॉईन अन्ननलिकेत अडकल्याने जवळपास बारा तासापासून चिमुरडा अन्न-पाण्यावाचून होता. त्यामुळे त्याच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.

हेही वाचा : दोन दिवसांच्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, पादचाऱ्यामुळे अर्भकाला जीवदान

ईएनटी विभागाच्या प्रमुख डॉक्टर निलम साठे यांनी मोठा धोका पत्करुन चिमुरड्या प्रेमवर तातडीने शस्त्रक्रिया केली. “शस्त्रक्रिया करणे इतर वेळी तसे जिकीरीचे नसते, मात्र सध्याच्या काळात पीपीई कीट घालून सर्जरी करणे काहीसे आव्हानात्मक होते” असे डॉ निलम साठे यांनी सांगितले.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची कोव्हीड चाचणी घेण्यात आली होती, मात्र चिमुकला बारा तासांपेक्षा अधिक काळ उपाशीपोटी असल्याने अहवाल येण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करणे भाग होते, असेही त्या म्हणाल्या. कोरोनाचा धोका पत्करुन चार ते पाच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. लेकाचा जीव वाचवल्याबद्दल वानखेडे कुटुंबानेही डॉक्टरांचे आभार मानले.

रुग्णाच्या कोव्हीड चाचणीचा रिपोर्ट उद्या येणार आहे. जर रुग्ण पॉझिटिव्ह निघाला, तर डॉक्टरांनाही क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र कठीण काळातही रुग्णसेवेचे भान राखणाऱ्या डॉ. निलम साठे आणि त्यांच्या टीमच्या रुपाने माणुसकी जिंकली आणि कोरोना हरल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

(KEM Hospital  ENT Surgeon perform endoscopic surgery on 8 year old boy to remove coin stuck in food pipe)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.