परळीत झुडपात टाकलेल्या बाळाला जीवदान, धनंजय मुंडे-सुप्रिया सुळेंकडून पालकत्व

परळीत रेल्वे रुळाजवळ असेलल्या काटेरी झुडपात नवजात बालिकेला टाकून दिल्याचा प्रकार समोर आला होता, या बाळाचं पालकत्व धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं

Supriya Sule Dhananjay Munde helps Baby, परळीत झुडपात टाकलेल्या बाळाला जीवदान, धनंजय मुंडे-सुप्रिया सुळेंकडून पालकत्व

बीड : परळी शहरात झुडपात टाकलेल्या नवजात बाळाला जीवदान मिळालं आहे. बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी बालिकेचं पालकत्वही स्वीकारलं. राजकारणापलिकडे जात मुंडे आणि सुळे यांनी अनोखं सामाजिक भान जपल्याचं पाहायला मिळत (Supriya Sule Dhananjay Munde helps Baby) आहे.

बीड जिल्ह्यातील परळी शहरात नुकतंच जन्मलेलं स्त्री जातीचं अर्भक सापडलं होतं. रेल्वे रुळाजवळ असेलल्या काटेरी झुडपात बाळाला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर चिमुकलीला तात्काळ परळीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खासदार सुप्रिया सुळे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या धनंजय मुंडे यांनी या मुलीचं पालकत्व स्वीकारलं आहे. महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडल्याने नवजात मुलीचं ‘शिवकन्या’ असं नामकरण करण्यात आलं.

नेमका हा प्रकार कोणी केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकाराची माहिती मिळताच परळी शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत.

धनंजय मुंडे यांच्या कनवाळूपणाचं उदाहरण याआधीही पाहायला मिळालं होतं. बीडमधील एकाच कुटुंबातील सहा अंध सदस्यांना धनंजय मुंडे यांनी प्रत्येकी एक लाखाची आर्थिक मदत केली.

अंध कुटुंबाला मदतीचा हात

बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील एकाच कुटुंबातील सहा जण अंध आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची परवड होत होती. अनेक वेळा शासनदरबारी खेटे मारुनदेखील त्यांना कुठलीच शासकीय मदत मिळाली नव्हती.

ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या अंध कुटुंबाची भेट घेत त्यांच्या हाल-अपेष्टा जाणून घेतल्या. अंध कुटुंबाचं दुःख जाणून घेतल्यानंतर धनंजय मुंडे हेलावून गेले. त्यांनी सामाजिक न्याय विभागातून या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.

(Supriya Sule Dhananjay Munde helps Baby)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *