AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांच्या वाहनाचे स्टेरिंग अनिकेत तटकरेंच्या हाती, मोठी खळबळ, व्हिडीओ…

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सुनेत्रा पवार यांचे दाैरे सुरू आहेत. त्यामध्येच आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सुनेत्रा पवार यांची गाडी अनिकेत तटकरे यांनी चालवल्याचे बघायला मिळतंय.

सुनेत्रा पवार यांच्या वाहनाचे स्टेरिंग अनिकेत तटकरेंच्या हाती, मोठी खळबळ, व्हिडीओ...
Sunetra Pawar car
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 3:16 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून सकाळी बारामतीकडे निघाले. 8.45 बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघाताची खळबळ उडवणारी फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. अजित पवार यांच्यासह 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. कोणालाही विश्वास बसत नव्हता की, अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाने फक्त पवार कुटुंबावरच नाही तर संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, एक पोकळी निर्माण झाली. अजित पवार यांची अर्थखात्यावर मोठी पकड होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच बारामतीकडे रवाना झाले. लोक मोठ्या संख्येने बारामतीकडे निघाले.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच पक्षाची सर्व धुरा त्यांनी आपल्याच हाती ठेवली. सुनील तटकरे, छगन भुजबळ असा वरिष्ठ नेत्यासोबत बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नाही. यावरून पवार कुटुंबातील एक वाद पुढे आला.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. अनेक दाैरे करताना त्या दिसत आहेत. सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गाडी चालवली. सुनेत्रा पवार बाजूला बसलेल्या असताना अनिकेत तटकरे यांनी गाडीचे स्टेरिंग आपल्या हाती घेतले.

यावरून आता अनिकेत तटकरे यांच्यावर जोरदार टीका होत असून त्यांनी प्रोटोकॉल तोडला असून दादांच्या निधनावर शंका उपस्थित होत असताना सुनेत्रा पवार यांना सुरक्षा असताना अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची गाडी कशी चालवली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रोटोकॉलनुसार अस होऊ शकत नाही. घटनेचे गांभीर्य पाहिजे ना कोणी प्रतिबंध का नाही केला? घातपात झाला असता तर कोणाला जबाबदार धरले असते?, असा प्रश्न संदीप उदमले यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

Follow Us
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा.
काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा
काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार, सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा.
लव्ह जिहादला धर्म नसतो; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठ
लव्ह जिहादला धर्म नसतो; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठ.
बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घ्या; फडणवीसांचा सपकाळांना फोन
बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घ्या; फडणवीसांचा सपकाळांना फोन.
सरकार मुकं, बहिरं अन् आंधळंही कारण...., 'या' मुद्यावरुन हर्षवर्धन सपका
सरकार मुकं, बहिरं अन् आंधळंही कारण...., 'या' मुद्यावरुन हर्षवर्धन सपका.
भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?.... सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?.... सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल.
भोंदू खरातच्या तसल्या व्हिडीओची ऑनलाईन विक्री, महिलांचे आक्षेपाहार्य..
भोंदू खरातच्या तसल्या व्हिडीओची ऑनलाईन विक्री, महिलांचे आक्षेपाहार्य...
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार?.
रोहित पवारांचा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यशस्वी होणार?
रोहित पवारांचा बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न यशस्वी होणार?.