Sanjay Raut On BJP Leaders | भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन मोठेपणा दाखवतात, संजय राऊतांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आणि संघावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, संघ आणि भाजपच्या लोकांना काहीही धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते, असा टोला संजय राऊतांनी लगावला. तरीही भाजपचेच लोक जास्त सुरक्षा घेतात. देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका असल्यासारखं दाखवलं जातं, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आणि संघावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, संघ आणि भाजपच्या लोकांना काहीही धोका नाही. त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, निरर्थक लोकं आहेत ते, असा टोला संजय राऊतांनी लगावला. तरीही भाजपचेच लोक जास्त सुरक्षा घेतात. देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका असल्यासारखं दाखवलं जातं, असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, झेड प्लस, डबल झेड प्लस किंवा एनएसजी कमांडो अशी कडक सुरक्षा प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटातील लोकांनाच दिली जाते. इतर पक्षांचे नेते मात्र निर्भयपणे फिरतात. आमच्याजवळ येण्याची कुणाची हिंमत नाही, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षा ठेवली किंवा काढली याचा फार बाऊ करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. काही लोक सुरक्षा घेऊन आपण खूप मोठे आहोत किंवा आपल्या जीवाला मोठा धोका आहे, असे दाखवतात. पण त्यांचे “राष्ट्रकार्य” नेमके काय आहे, हे सगळ्यांना दिसत आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
Published on: Feb 21, 2026 11:21 AM
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक

