Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांना मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव आणि पाचोरा शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांना अक्षरशः नदी-नाल्याचे स्वरूप आले आहे. सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून, दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांतही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. हवामानाचा जोर कायम राहिल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
याशिवाय, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नदी-नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Jul 08, 2026 05:24 PM
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....