AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ

एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच… पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 08, 2026 | 8:56 PM
Share

राज्यात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांच्या घरातील साहित्य, जनावरे आणि शेतीचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच रायगड जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.

राज्यात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांच्या घरातील साहित्य, जनावरे आणि शेतीचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच रायगड जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.

पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. एमआयडीसी आणि चावणे परिसरातील गोदाम आणि साठवण केंद्रांमधून हे सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये भरलेले तसेच रिकामे अशा दोन्ही प्रकारच्या सिलेंडरचा समावेश आहे.

पुराच्या पाण्यासोबत हे सिलेंडर विविध भागात वाहून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना हे सिलेंडर सापडतील त्यांनी ते स्वतः वापरण्याचा किंवा हलवण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगण्यात आले आहे.

तसेच संबंधित सिलेंडर तात्काळ HPCL प्रशासनाकडे जमा करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सिलेंडरचा शोध घेण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

Published on: Jul 08, 2026 08:56 PM

Follow Us