tv9 Marathi Special Report | महाराष्ट्र आयसीयूमध्ये; सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत महाराष्ट्र “आयसीयूमध्ये” असल्याचे वक्तव्य केले. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. पराभवानंतर कार्यकर्त्यांना धीर देतानाच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत महाराष्ट्र “आयसीयूमध्ये” असल्याचे वक्तव्य केले. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. पराभवानंतर कार्यकर्त्यांना धीर देतानाच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, “आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राज्य आयसीयूमध्ये असल्यासारखे वाटते. जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी घाणेरडी सूज आहे की अनेकांना वाटतं, जे काही चालू आहे ते कायमस्वरूपी आहे. पण कायमस्वरूपी काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते.” सत्ताधाऱ्यांना इशारा देताना त्यांनी म्हटले, “सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी असते.” देशात दीर्घकाळ सत्ता उपभोगलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दाखला देत ते म्हणाले, “एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती. 57-58 वर्षे देशावर राज्य करणारा पक्ष आज चाचपडताना दिसतो आहे. तीच परिस्थिती आता सत्तेत असलेल्या पक्षाची देखील होणार आहे.” ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिका निवडणुकीचा मुद्दा मराठी हाच होता, तर भाजपने मराठीसह विकासाचा मुद्दा लावून धरला. मात्र हा विकास नव्हे तर सूज असल्याची टीका राज ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर केली.
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ

