एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर…नेमकं काय घडलं?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी NDA मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.

यानंतर आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील अनेक आमदार उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात काही मोठे बदल होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, या बैठकीत आमदार रोहित पवार अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी पक्षांसोबत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
त्यामुळे बैठकीतील उपस्थिती आणि अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या चर्चांदरम्यान पक्षाची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 08, 2026 08:03 PM
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....