AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इग्नोर करायची म्हणून डोक्यात राग, पिझ्झा खाल्ला अन्… सारूळच्या भयानक जंगलात घुमली शेवटची किंकाळी; भयानकच घडलं

नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली. तिच्या मृत्यूच गूढही उकलण्यात पोलिसांना यश आलं असून याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्याात आली आहे.

इग्नोर करायची म्हणून डोक्यात राग, पिझ्झा खाल्ला अन्... सारूळच्या भयानक जंगलात घुमली शेवटची किंकाळी; भयानकच घडलं
नाशिक क्राईम
| Updated on: Feb 21, 2026 | 1:56 PM
Share

अख्ख्या नाशिकला हादरवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. सारुळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. विशेष म्हणजे तिच्या मृतदेहाजवळ पिझ्झाही आढळला होता. या हत्याकांडामुळे मोठी खळबळ माजली होती. मात्र अखेर पोलिसांनी कसून तपास केला आणि या तरूणीच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात त्यांना यश मिळालं आहे. नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिच्या मारेकऱ्यांना शोधण्यातही पोलिसांना यश आलं. या खुनाप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ओळख पटल्यानंतर मुलीचा मृतदेह घेण्यासाठी नातलग बुलढाण्यावरून नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. या घटनेने फक्त नाशिक नव्हे तर अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी अल्पवयीन असून ती अवघ्या 16 वर्षांची असून अल्पवयीन होती. ती बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथील असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. मात्र या 16 वर्षांच्या मुलीचा तिच्याच प्रियकराने, मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासत उघड झालं आणि सगळेच हादरले. दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आणखी एकाचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. अथर्व देशमुख आणि सुमित सानप अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयितांची नावं आहेत.

क्रूर हत्या, गळ्यात चाकू आणि पिझ्झा

नाशिकच्या ग्रामीण भागात खळबळजनक घटना घडली होती. सारुळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडला होता. एवढंच नव्हे तर या मृत मुलीच्या गळ्यात चाकू अडकलेला होता नाशिकच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना होती. विचित्र गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाशेजारी पिझ्झाही ठेवलेला आढळला होता. ही मुलगी कोण, ती तिथं कशी पोहचली ? सोबत कोण होतं ? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.

इग्नोर करतेय म्हणून केली प्रियकराने हत्या

ही मुलगी बुलढाण्याची होती. मुलीच्या आणि आरोपी मुलाच्या, घरचे दोन्ही एकमेकांच्या ओळखीचे ,मुलगा आणि मुलगी हे दोन्ही शिंदखेडा राजा येथील रहिवासी आहेत. मुलीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती नाशिक पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आली. हत्या झालेली अल्पवयीन मुलगी ही संशयित आरोपीची मैत्रीण होती. आरोपी हा नाशिकच्या संदीप फाऊंडेशन येथे शिक्षण घेत होता, तर मुलगी अकोले येथे अकरावीत शिकत होती. ही मुलगी दुसऱ्या एका मुलाशी बोलत होती. त्यातूनच ती आपल्याला इग्नोर करते असं आरोपीला वाटू लागलं. त्याला त्यामुळे प्रचंड राग आला आणि त्यातूनच त्याने हे भयानक कृत्य केलं. बुलढाण्यावरून नाशिक कडे येतानाच त्याने मुलीची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह सारूळच्या जंगलात टाकल्याचे निष्पन्न झाले. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?