Badlapur News | बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.
बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिलांना आर्थिक मदतीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात येत होती. पीडित महिलेने या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन महिलांना ताब्यात घेतले. प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे बदलापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
ठाकरे गटाला मोठा धक्का! चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश

