AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट ACP ऑफिसमध्ये घुसला 5.5 फुटांचा विषारी कोब्रा, बघताच महिला कर्मचाऱ्याने थेट…, अर्धा तास चालला थरार

कल्याणमध्ये शुक्रवारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला. कल्याण एसीपी कार्यालय येथे साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली.

थेट ACP ऑफिसमध्ये घुसला 5.5 फुटांचा विषारी कोब्रा, बघताच महिला कर्मचाऱ्याने थेट..., अर्धा तास चालला थरार
| Updated on: Feb 21, 2026 | 1:57 PM
Share

Kalyan News : सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये रेल्वेमधील हाणामारी असेल किंवा रेल्वेमध्ये दिसणाऱ्या इतर काही गोष्टी असतील. या अशा घटनांचे व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशातच आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या ACP कार्यालय, कल्याण पश्चिम येथे सोमवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. सुमारे साडेपाच फूट लांबीचा अतिविषारी इंडियन कोब्रा (नाग) अचानक कार्यालयात शिरल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

महिला कर्मचाऱ्यांची धावपळ

अचानक कोब्रा दिसताच कार्यालयातील कर्मचारी घाबरून गेले. विशेषतः एका कक्षात काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ दरवाजा बंद करून स्वतःला सुरक्षित केले. जवळपास अर्धा तास त्या खोलीतच कोंडून घेत त्यांनी बाहेर परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहिली. दरम्यान, हा कोब्रा एसीपींच्या मुख्य कक्षाच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचाऱ्यांनीही सुरक्षित स्थळी धाव घेतली.

सुदैवाने घटनेच्या वेळी संबंधित एसीपी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत दक्षतेने आणि कौशल्याने त्याला पकडले. सुमारे 20 वर्षांच्या अनुभवात इतक्या गजबजलेल्या शासकीय कार्यालयात एवढा मोठा आणि विषारी कोब्रा आढळणे दुर्मिळ असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

कार्यालयात कसा आला कोब्रा?

कोब्रा नेमका कार्यालयात कसा शिरला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परिसरातील झाडाझुडपांतून किंवा गटारमार्गे तो आत शिरला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रेस्क्यू केल्यानंतर कोब्राला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

स्टेशनलगतच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्रांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...