Sanjay Raut Uncut PC | टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊत यांनी एका वाक्यात विषय संपवला
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात टिपू सुलतानचा मुद्दा गाजत आहे. मालेगावचे उपमहापौर निहाल अहमद यांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता. भाजपने या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता आणि त्या विरोधात निदर्शनेही झाली होती. आता हा वाद पुन्हा उठत असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या वादावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात टिपू सुलतानचा मुद्दा गाजत आहे. मालेगावचे उपमहापौर निहाल अहमद यांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता. भाजपने या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता आणि त्या विरोधात निदर्शनेही झाली होती. आता हा वाद पुन्हा उठत असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या वादावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, “टिपूच्या नावाने भाजप टिपऱ्या वाजवत आहे.” संजय राऊत मालेगावला कोर्टाच्या केस निमित्ताने आले होते आणि त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, मुंबईसारख्या शहरात महापौर रितू तावडे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानचे नाव देण्याचे ठराव मंजूर केले आहेत. मिरा भाईंदर आणि अकोला येथेही भाजपच्या सत्तेत अशा कामांना चालना दिली गेली आहे. संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, “टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढला आणि इंग्रजांविरोधात लढताना त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या जीवनातील काही चुका जसे की धर्मांतर, याला कोणीही समर्थन देणार नाही. भाजपने मात्र त्याला पाठिंबा दिलेला आहे, म्हणून टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजत आहेत.” असं राऊत म्हणाले, तसेत, या वादावर आमच्या पक्षाची कोणतीही भूमिका नाही, असं देखील राऊत यांनी स्पष्ट केलं.
Published on: Feb 21, 2026 01:24 PM
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट

