कोल्हापुरात भरणार ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी, डिजिटल प्रशिक्षण दिलेले शिक्षक लाईव्ह मार्गदर्शन करणार

| Updated on: Aug 23, 2021 | 7:25 AM

संदीप गुंड यांनी बनवलेल्या या ऑनलाईन शाळा ॲपमध्ये डिजिटल प्रशिक्षण दिलेले शिक्षक लाईव्ह मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नाही तर लेक्चर कॅप्चर स्टुडिओमध्ये तयार केलेले शिक्षकांचे व्हिडिओ देखील या ॲपमध्ये असतील. एकाच वर्गाच्या एकाच विषयासाठी पाच ते सहा शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

कोल्हापुरात भरणार ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी, डिजिटल प्रशिक्षण दिलेले शिक्षक लाईव्ह मार्गदर्शन करणार
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाईन पद्धतीने वर्ग भरत असले तरी त्यातही अनेक मर्यादा आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागवतोय. यावरच पर्याय म्हणून ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी ही नवीन संकल्पना समोर आलीय. जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासनाला एकत्र आणणारी ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये राबवली जाणार आहे. (An online school virtual academy to be set up in Kolhapur)

दिपस्तंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून बनवले ऑनलाईन शाळा हे ॲप

लाईट्स, कॅमेरा, मॉनिटर, पोडीयम हे सगळं पाहून तुम्हाला वाटलं असेल हा एकदा फोटो स्टुडिओ किंवा मग एखाद्या वेब सिरीजचा सेट असेल. पण मंडळी थोडं थांबा हा स्टुडिओ तर आहे मात्र तो आहे लेक्चर कॅप्चर स्टुडिओ. ती ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतला. तुम्हाला नक्की आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. कोरोना महामारीमुळे सध्या शाळा ऑनलाईन भरत आहेत. मोठ्या शहरातल्या खाजगी शाळा वेगवेगळ्या अॅपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. त्याचवेळी प्राथमिक शाळांना मात्र मीटिंग ॲपचा वापर टीचिंगसाठी करावा लागतोय. यातही तांत्रिक अडचणी इतक्या की हे शिक्षण नकोच अशीच भावना विद्यार्थ्यांचीच नाही तर शिक्षकांची देखील होऊ लागलेय. मात्र नगर जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी आपल्या दिपस्तंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन शाळा हे ॲप बनवले जे या सगळ्या अडचणींवर मात करत दर्जेदार शिक्षण देणार आहे.

डिजिटल प्रशिक्षण दिलेले शिक्षक लाईव्ह मार्गदर्शन करणार

संदीप गुंड यांनी बनवलेल्या या ऑनलाईन शाळा ॲपमध्ये डिजिटल प्रशिक्षण दिलेले शिक्षक लाईव्ह मार्गदर्शन करणार आहेत. इतकंच नाही तर लेक्चर कॅप्चर स्टुडिओमध्ये तयार केलेले शिक्षकांचे व्हिडिओ देखील या ॲपमध्ये असतील. एकाच वर्गाच्या एकाच विषयासाठी पाच ते सहा शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आपल्याला समजेल अशा भाषेत शिकवणाऱ्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेता येणार आहे. इतकंच नाही तर किती विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. किती शिक्षकांनी किती वेळ मार्गदर्शन केलं हे तर समजणार आहेच पण इथं विद्यार्थी शिक्षकांना रेटिंग देणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचा देखील कस लागणार आहे.

कागल तालुक्यातील बानगी येथून प्रयोगाची सुरुवात

राज्यातील प्राथमिक शाळा त्यातील शिक्षक विद्यार्थी आणि प्रशासनाला एकत्र आणणारा हा पहिलाच प्रयोग आहे. ज्याची सुरुवात कागल तालुक्यातील बानगी इथून झालीय. बानगी गावात या संकल्पनेचा मध्यवर्ती लेक्चर कॅप्चर स्टुडिओ बनवण्यात आलाय. त्याचं उद्घाटन नुकतच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. पहिल्या टप्प्यात कागल पंचायत समिती आणि नगर जिल्ह्यातील पारनेर इथल्या प्राथमिक शाळांचा या उपक्रमात समावेश आहे. टप्प्याटप्प्याने ही संकल्पना राज्यभरातील प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

सध्या 42 हजार विद्यार्थी हे ॲप वापरत आहेत. तर या महिना अखेरपर्यंत 1 लाख 68 हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप पोचवण्याचं उद्दिष्ट आहे. ॲपमुळे शालेय शिक्षण मनोरंजनात्मक पद्धतीने मिळत असल्याचं ॲप वापरणारे विद्यार्थी सांगताहेत तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षक या शिकवण्याच्या पद्धतीवर तसाच त्यातून मिळणार्‍या प्रतिसादावर समाधान व्यक्त करत आहेत. (An online school virtual academy to be set up in Kolhapur)

इतर बातम्या

Video | याला माकड म्हणावे की स्पायडरमॅन ? भिंतीवर चढताना नेमकं काय केलं ते एकदा पाहाच !

Bigg Boss OTT Shocking : करण नाथ आणि रिद्धिमा पंडित शोमधून बाहेर, लोकांनी एका कनेक्शनला केले वोट आऊट