Bigg Boss OTT Shocking : करण नाथ आणि रिद्धिमा पंडित शोमधून बाहेर, लोकांनी एका कनेक्शनला केले वोट आऊट

बिग बॉस ओटीटीच्या घरातील सर्वात सुंदर जोडप्याने शेवटी कुटुंबातील सदस्यांना निरोप दिला. रिद्धिमा आणि करणच्या एविक्शनची बातमी ऐकून सर्व स्पर्धक खूप भावूक झाले.

Bigg Boss OTT Shocking : करण नाथ आणि रिद्धिमा पंडित शोमधून बाहेर, लोकांनी एका कनेक्शनला केले वोट आऊट
करण नाथ आणि रिद्धिमा पंडित शोमधून बाहेर, लोकांनी एका कनेक्शनला केले वोट आऊट

मुंबई : वूट(Voot)वर स्ट्रीम होणाऱ्या बिग बॉस ओटीटीच्या घरातून करण नाथ आणि रिद्धिमा पंडित हे आज वोट आऊट झाले. जनतेच्या कमी मतांमुळे दोघांनाही शोमधून बाहेर पडावे लागले. वास्तविक, परस्पर संमतीच्या अभावामुळे, बिग बॉसने गेल्या आठवड्यात शिक्षा म्हणून एविक्ट होण्यासाठी सर्व स्पर्धकांना नामांकित केले होते. बिग बॉस ओटीटीच्या घरातील सर्वांना असे वाटत होते की यावेळी फक्त एक स्पर्धक शोमधून बाहेर पडेल, परंतु करण जोहरने सर्वांना सर्वात मोठा धक्का दिला जेव्हा त्याने घोषित केले की आज एक नाही तर दोन लोक घराबाहेर जातील. (Karan Nath and Riddhima Pandit out of the show, people voted for a connection)

बिग बॉस ओटीटीच्या घरातील सर्वात सुंदर जोडप्याने शेवटी कुटुंबातील सदस्यांना निरोप दिला. रिद्धिमा आणि करणच्या एविक्शनची बातमी ऐकून सर्व स्पर्धक खूप भावूक झाले. दिव्या अग्रवाल सोबत, करणला अनेक कुटुंबातील सदस्य आपला भाऊ मानत होते. त्याचा शांत आणि प्रेमळ स्वभाव सर्वांना आवडायचा. रिद्धिमा पंडित यांचीही दिव्या अग्रवाल, राकेश बापट आणि निशांत भट यांच्याशी खूप चांगली मैत्री होती. कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून करण आणि रिद्धिमा यांनी त्यांना शांत केले.

करण जोहरने दिले प्रोत्साहन

एलिमिनेशनची घोषणा केल्यानंतर, करण जोहरने बिग बॉस ओटीटीच्या एलिमिनेट स्पर्धक करण नाथला सांगितले की लोकांना घराबाहेरही तुम्हाला खूप पसंत केले आहे. मला माहित आहे की तुम्हाला तुमच्या करिअरच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण हळूहळू हे चित्र बदलेल. बिग बॉसच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण नाथला पाहून लोकांनी त्याला पसंती देण्यास सुरुवात केली असल्याचेही करण म्हणाला. यामुळे करणला भविष्यात नक्कीच काम मिळेल याची त्याला खात्री आहे.

वडिलांना भेटायला उत्सुक आहे रिद्धिमा

आज रिद्धिमा पंडितच्या वडिलांचा वाढदिवस आहे. जरी रिद्धिमा एलिमिनेशनची बातमी ऐकून खूप दु: खी झाली असली तरी दुसरीकडे ती आनंदातही होती की ती या दिवशी तिच्या वडिलांना भेटू शकेल. एविक्शनची बातमी ऐकून रडणाऱ्या बिग बॉसच्या कुटुंबातील लोकांना रिद्धिमा म्हणाली की, मला खूप आनंद झाला आहे की आज मी माझ्या वडिलांना भेटेन आणि म्हणूनच तुम्ही रडू नका. जर तुम्ही लोक असे रडायला लागलेत तर मी पण रडेल. सर्वांना मिठी मारत, करण नाथ आणि रिद्धिमा घरातून बाहेर पडले. (Karan Nath and Riddhima Pandit out of the show, people voted for a connection)

U-20 World Athletics : भारताच्या शैली सिंहला लांब उडीत रौप्य, छोट्याशा फरकाने सुवर्णपदकाची हुलकावणी

पालघरमधील आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; प्रविण दरेकरांचे आश्वासन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI