MPSC चे विद्यार्थी, आता कांदे-बटाटे विकतात, कोल्हापूरच्या दोन तरुणांची कहाणी

| Updated on: Jul 17, 2021 | 2:16 PM

दीपक गोते आणि जयंवंत गोते यांनी कांदा बटाटा विक्रीचं स्टार्ट अप सुरु केलंय. त्यातून पैसे कमवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. स्पर्धा परीक्षा होत नाहीत म्हणून निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आदर्शवत उदाहारण आहे. 

MPSC चे विद्यार्थी, आता कांदे-बटाटे विकतात, कोल्हापूरच्या दोन तरुणांची कहाणी
दीपक गोते, जयवंत गोते
Follow us on

कोल्हापूर: राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला गोंधळ, रखडलेल्या नियुक्त्या आणि थांबलेल्या परीक्षा यामुळ एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडलेत. पुण्यातील स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर तर हा प्रश्न अधिकच गंभीर यांना समोर आलाय. मात्र, कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या दीपक गोते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या परीक्षांचा अभ्यास सुरु ठेवतचं वेगळी वाट धरलीय. दीपक गोते आणि जयंवंत गोते यांनी कांदा बटाटा विक्रीचं स्टार्ट अप सुरु केलंय. त्यातून पैसे कमवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. स्पर्धा परीक्षा होत नाहीत म्हणून निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आदर्शवत उदाहारण आहे.

कांदा बटाटा विक्री साठी आरोळी

दीपक गोते आणि जयवंत गोते हे कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये भाड्याचा टेम्पो घेऊन कांदा बटाटा विक्री करतात. उच्चशिक्षित असलेले आणि स्पर्धा परीक्षा देणारे हे विद्यार्थी आज कोणतीही मनात कोणताही संकोच न बाळगता कांदा बटाटा विक्री करत आहेत. खरंतर दीपक आणि जयवंत हे दोघेही राधानगरी तालुक्यातील गोतेवाडी गावचे आहेत.

शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये

घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने ते शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात आले. छोटी मोठी नोकरी करत शिक्षण पूर्ण केलं आणि अधिकारी होण्याचे स्वप्न बघून एमपीएससी परीक्षेकडे वळले. मात्र, गेली तीन चार वर्षे परीक्षाच झाल्या नाही यात ज्या झाल्या त्यांचे निकाल लटकले नि ज्यांचे निकाल लागले त्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या अशी परिस्थिती आहे.त्यातच आलेल्या कोरोना संकटामुळे या मुलांची उरलीसुरली आशा आहे आता आता संपली.अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलेल्या या तरुणांचे आता गावाकडे जाण्याची मानसिकताही राहिलेली नाही. मात्र, शहरातला उदरनिर्वाह तर स्वतः केला पाहिजे. यामुळं जयवंत आणि दीपक यांच्या मित्रांनी कांदा बटाटा विक्रीचा मार्ग आता स्वीकारलाय.

कांदा बटाटा विक्रीसाठी आरोळी

रोज सकाळी लवकर उठून मार्केटमधील संवाद यातून कांदे-बटाटे खरेदी करायचे ते भाड्याने घेतलेल्या टेम्पोतून उपनगरात जायचं, असं या तरुणांचं काम सुरु आहे. शहर आणि उपनगरात टेम्पोतून फिरून आरोळी ठोकत कांदा बटाटा विक्री करायचं हा या युवकांचा आता दिनक्रम बनला आहे. कांदा-बटाटा विक्रीचा हा नवा स्टार्टअप या तरुणांनी केला असला तरी रात्रीच्या वेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील त्यांनी अजूनही सुरूच ठेवला आहे. या नव्या व्यवसायातून त्यांना आता थोडे फार पैसे देखील मिळू लागले आहेत.या तरुणांनी नैराश्यावर मात करत सुरु केलेला हा नवीन छोटेखानी व्यवसाय ग्राहकांचाही पसंतीला उतरतोय, असं उमरशरीफ मुजावर या ग्राहकांनी सांगितलं आहे.

नैराश्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहारण

अधिकारी बनायचं स्वप्न घेऊन गाव सोडायच. पोटाचे चिमटे काढत तासन तास अभ्यास करायचा. अनेक वेळा स्पर्धेत येणारे अपयश हे कमी की काय म्हणून आता परीक्षाच लटकल्या. या सगळ्या परिस्थितीमुळे एमपीएससी करणारे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांसाठी गोते बंधूंचा हा स्टार्ट अप आदर्शवत ठरतोय हे नक्की आहे.

इतर बातम्या:

महापौर आणि काँग्रेस नेते एकाच मंचावर, पेडणेकर म्हणाल्या, एकत्र राहू, काँग्रेसचं रोखठोक उत्तर

“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”

Deepak Gote Jayawant Gote and friends aspirants of MPSC started onion and potato sale start-up in kolhapur