महापौर आणि काँग्रेस नेते एकाच मंचावर, पेडणेकर म्हणाल्या, एकत्र राहू, काँग्रेसचं रोखठोक उत्तर

आजच्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे , तर चांगलं होईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महापौर आणि काँग्रेस नेते एकाच मंचावर, पेडणेकर म्हणाल्या, एकत्र राहू, काँग्रेसचं रोखठोक उत्तर
Kishori Pednekar_Ravi Raja_ Bhai Jagtap
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 2:00 PM

मुंबई : “मुंबई आणि महाराष्ट्रसाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे”, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी काँग्रेसला (Congress) सोबत राहण्याचं आवाहन केलं. मात्र आम्ही स्वबळावरच लढणार, असं काँग्रेसने ठणकावून सांगितलं. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar appeals congress for alliance but Ravi Raja said we will fight own BMC Election)

मुंबईतील शीव इथे एका कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेसने केलं होतं. विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप एकत्र होते. शिवसेना आणि काँग्रेसचे महापालिकेतील नेते एकत्र, एकाच मंचावर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा काँग्रेसने वारंवार केली आहे.

याबाबत आजच्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे , तर चांगलं होईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

काँग्रेस स्वबळावर ठाम

किशोरी पेडणेकर यांनी एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर, लगेचच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नकार दिला. आम्ही स्वबळावरच लढणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

महापालिकेत काँग्रेस आक्रमक 

राज्यात शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत मात्र या दोन्ही पक्षात विस्तवही जात नाही. संधी मिळताच महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणायचं असं धोरण काँग्रेसने घेतलेलं दिसतंय. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या नालेसफाईच्या या आकडेवारीचा पर्दाफाश करणार असल्याचंही रवी राजा यांनी स्पष्ट केलं होतं.

मुंबई महापालिकेने मुंबई शहरात 102 टक्के, पूर्व उपनगरात 93 टक्के तर पश्चिम उपनगर 96 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यावर रवी राजा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

संबंधित बातम्या 

मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला! कशी होणार महाआघाडी?

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार; आता विरोधी पक्षनेते रवी राजांचाही नारा

मुंबई महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी; काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.