शेगाव दर्शनाचा पॅटर्न पंढरपुरात राबवा, दररोज 3 हजार भाविकांचं दर्शन शक्य, वारकऱ्यांची राज्य शासनाकडे मागणी

| Updated on: Jun 23, 2021 | 9:33 AM

कोरोना संकट काळात देवदर्शनासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राबविलेला दर्शन पॅटर्न आषाढ वारीत पंढरपूरला राबिल्यास 90 हजारांवर भाविक दर्शन घेवू शकतील.

शेगाव दर्शनाचा पॅटर्न पंढरपुरात राबवा, दररोज 3 हजार भाविकांचं दर्शन शक्य, वारकऱ्यांची राज्य शासनाकडे मागणी
फोटो : विठ्ठ्ल रुक्मिणी
Follow us on

अकोला : कोरोना संकट काळात देवदर्शनासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राबविलेला दर्शन पॅटर्न आषाढ वारीत पंढरपूरला राबविल्यास 90 हजारांवर भाविक दर्शन घेवू शकतील. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करून दर्शनाची व्यवस्था करण्याचा पॅटर्न पंढरपुरात राबविण्याची मागणी वारकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे. (Implement Shegaon Darshan pattern in Pandharpur, warkari demand from the state government)

कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्वच देवस्थान बंद आहेत. भाविकांना ओढ लागली आहे ती पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनाची… आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल… असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे…पण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व सरकारने मनात आणले तर पूर्ण महिन्यात कमीत कमी 90 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील…!

ऑनलाईन प्रक्रिया…

शेगाव येथील गजानन महाराज संस्थानमध्ये एका दिवसात तीन हजार भाविकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन दिल्या जात होते आणि ही प्रक्रिया सर्व ऑनलाईन असल्यामुळे ज्या भाविकांचा दर्शनाचा नंबर आहे तो भाविक त्या तारखेला ठराविक वेळेवर तिथे उपस्थित राहत होता.

शेगाव पॅटर्न राबवला तर दररोज 3 हजार भाविकांना दर्शन शक्य!

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीने शेगाव पॅटर्न राबवून भाविकांना दर्शन द्यायचं ठरविल्यास आणि सरकारने जर पुढाकार घेऊन होकार दिला तर एका दिवसाला तीन हजार भाविक म्हणजे तीस दिवसांमध्ये 90 हजार भाविक कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेऊ शकतात.. या नियोजनाने पंढरपूरमध्ये गर्दी होणार नाही… आणि दररोज तीन हजार भाविक जर पंढरपूरमध्ये दर्शनाला आले तर जे छोटे – मोठे व्यावसायिक आहेत त्यांनाही उपजीविकेचे साधन प्राप्त होईल…

भाविक आले तर देवस्थान आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मदत होईल

गेले दोन वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे देवस्थानला फार मोठी आर्थिक झळ पोहोचलेली आहे… भाविक दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला येत राहिले तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला आर्थिक स्वरुपात फार मोठी मदत होऊ शकेल…जे भाविक पंढरपूरमध्ये येतील त्यांच्याजवळ कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय त्यांना प्रवेश टाळावा, असे मत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केली आहे.

(Implement Shegaon Darshan pattern in Pandharpur, warkari demand from the state government)

हे ही वाचा :

Breaking | पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश