Sanjay Biyani : संजय बियाणी हत्याकांडातील 9 आरोपींवर मोक्का, आणखी सात दिवसांची कोठडी

| Updated on: Jun 14, 2022 | 12:13 AM

नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्याकांडाला तब्बल 2 महिने उलटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा कट रचणाऱ्या 6 आरोपींना अटक केली होती. खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

Sanjay Biyani : संजय बियाणी हत्याकांडातील 9 आरोपींवर मोक्का, आणखी सात दिवसांची कोठडी
संजय बियाणी हत्याकांडातील 9 आरोपींवर मोक्का
Image Credit source: TV9
Follow us on

नांदेड : नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्या प्रकरणात अटक असलेल्या 9 आरोपींविरुध्द पोलिसांनी मोक्का (Mocca) लावला. सर्व 9 आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना आणखी सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. यापूर्वी आरोपींना 10 दिवसांची कोठडी (Custody) सुनावण्यात आली होती. नंतर पुन्हा तीन दिवसांची कोठडी वाढवण्यात आली होती. कोठडी संपल्यावर पोलिसांनी सर्व 9 आरोपींवर मोक्का लावून त्यांना न्यायालयात हजर केले. दरम्यान या प्रकरणार गोळीबार करणारे दोन आरोपी अजून फरार आहेत. शिवाय तपासात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

खंडणीसाठी झाली होती बियाणींची हत्या

नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्याकांडाला तब्बल 2 महिने उलटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा कट रचणाऱ्या 6 आरोपींना अटक केली होती. खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती कोठडी सोमवारी संपली. त्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का लावून त्यांच्या कोठडीत अजून सात दिवसाची वाढ करण्यात आली आहे. अजूनही गोळीबार करणारे मुख्य 2 आरोपी मात्र अजूनही फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. (Mocca on 9 accused in Sanjay Biyani murder case in nanded)

हे सुद्धा वाचा