Supreme Court : मुलांना आईवडील दोघांच्या प्रेमाची गरज; सुप्रीम कोर्टाचे महत्वपूर्ण मत

राजस्थान उच्च न्यायालयाने मुलाचा वडिलांकडे अंतरिम ताबा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुटुंब न्यायालयाने जुलै 2021 मध्ये वडिलांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबर 2021 रोजी कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.

Supreme Court : मुलांना आईवडील दोघांच्या प्रेमाची गरज; सुप्रीम कोर्टाचे महत्वपूर्ण मत
मुलांना आईवडील दोघांच्या प्रेमाची गरज; सुप्रीम कोर्टाचे महत्वपूर्ण मतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:53 PM

नवी दिल्ली : मुलांना आई-वडिल (Parents) अर्थात दोघांचेही प्रेम आणि आपुलकी मिळणे आवश्यक असते. मातापित्याचे प्रेम हा मुलांचा हक्कच आहे. दोन्ही पालकांची सोबत मिळणे हाही मुलांचा हक्क आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने दिला आहे. न्यायालयाने एका प्रकरणात मुलाच्या ताब्याबद्दल दाखल झालेल्या याचिके (Petition)वर सुनावणी करताना महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवली आहेत. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही मते व्यक्त केली आहेत. जेव्हा दोन्ही पालक सोबत असतात, त्यावेळी मुले सर्वात जास्त आनंदी असतात, असेही खंडपीठाने नमूद केले.

मुलांना दोन्ही पालकांची गरज : न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुलांना आई-वडील या दोघांचीही तितकीच गरज असते, यात शंका नाही. जर एक पालक सोबत असेल तर मूल कदाचित तेवढे आनंदी नसेल, जेवढा आनंद मुलाला दोन्ही पालक एकत्र असताना होतो. याचाच विचार करून पालकांनी अर्थात पतिपत्नीने आपापसातील मतभेद संपवले पाहिजेत. मुलांना आई-वडील दोघांकडून प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे. जोडप्यामध्ये कितीही अंतर असले तरी मुलाला वडिलांची भेट नाकारता येत नाही, असेही न्यायालय म्हणाले.

वडिलांकडे मुलाचा ताबा देण्यास राजस्थान हायकोर्टाने दिला होता नकार

राजस्थान उच्च न्यायालयाने मुलाचा वडिलांकडे अंतरिम ताबा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुटुंब न्यायालयाने जुलै 2021 मध्ये वडिलांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबर 2021 रोजी कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. यानंतर वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या पित्याच्या बाजूने महत्वपूर्ण निकाल दिला.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला उदयपूर येथील मुलाच्या वसतिगृहात भेटण्याची परवानगी दिली. त्यामुळे याचिकाकर्त्या पित्याला मोठा दिलासा मिळाला. त्याने मुलगा आपल्या ताब्यात असताना प्रचंड खुश होता, असा दावा याचिकाकर्त्याने केला. त्याची दखल घेत न्यायालयाने पती-पत्नीने आपापसातील मतभेद संपवले पाहिजेत. मुलांना त्यांच्यासोबत दोन्ही पालक असताना किती आनंद होतो, हे सर्व दाम्पत्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नमूद केले आहे. (Important opinion of the Supreme Court on the petition filed for custody of the child)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.