AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Igatpari Accident : ओव्हरटेक करताना इगतपुरीजवळ कार पलटली, तीन जण गंभीर जखमी

सर्व जखमी आपल्या वॅगनर कारने नाशिकहून घोटीच्या दिशेने चालले होते. कार भरधाव वेगात चालली होती. कारचालक पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या नादात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने कारला मागून धडक दिली.

Igatpari Accident : ओव्हरटेक करताना इगतपुरीजवळ कार पलटली, तीन जण गंभीर जखमी
ओव्हरटेक करताना इगतपुरीजवळ कार पलटलीImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 13, 2022 | 9:19 PM
Share

इगतपुरी : पुढील वाहनाला ओव्हरटेक (Overtake) करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वॅगनर कार पलटी (Car Overturned) होऊन तीन जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना इगतपुरीमध्ये घडली. मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ आज दुपारी पावणेबारा वाजता हा अपघात झाला. उमेश आर. भट्टड (46), उल्हास एन. पारखी (50), अनिल विठ्ठल लोखंडे (45) सर्व राहणार नाशिक अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांची संख्या पुन्हा वाढत असून महामार्ग प्राधिकरण विभागाकडून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

सर्व जखमी आपल्या वॅगनर कारने नाशिकहून घोटीच्या दिशेने चालले होते. कार भरधाव वेगात चालली होती. कारचालक पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या नादात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने कारला मागून धडक दिली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसूचकता बाळगत अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर जालनाजवळ अपघात

समृद्धी महामार्गावर जालनाजवळ अपघात होऊन एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या अपघातामध्ये जानेफळ येथील सुनील निंबेकर, चंदू भाऊ सावळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर मेहकर येथील हॉटेल व्यवसायिक बळीराम खोकले यांचा मृत्यू झाला. अपघातातील व्यक्ती या हुंदाई कारने जालनावरून मेहकरकडे समृद्धी महामार्गावरून येत असताना कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती आहे. (Three persons were seriously injured when their car overturned near Igatpuri while overtaking)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा