लातूर महापालिकेचं मिशन ‘अतिक्रमण हटाव’, फौजफाट्यासह आयुक्त रस्त्यावर, बांधकामं सील, दुकाने हटवली!

| Updated on: Jul 17, 2021 | 11:02 AM

अतिक्रमणाविरोधात लातूर महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. जवळपास शंभर दुकानांवर पालिकेने कारवाई करीत अतिक्रमणे हटवली आहेत.

लातूर महापालिकेचं मिशन अतिक्रमण हटाव, फौजफाट्यासह आयुक्त रस्त्यावर, बांधकामं सील, दुकाने हटवली!
लातूर महापालिकेचं मिशन 'अतिक्रमण हटाव'
Follow us on

लातूर : अतिक्रमणाविरोधात लातूर महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. जवळपास शंभर दुकानांवर पालिकेने कारवाई करीत अतिक्रमणे हटवली आहेत. बेकायदा आणि पालिकेची दिशाभूल करून बांधकाम करण्यात आलेली अनेक बांधकामे पालिकेने सील केली आहेत . त्यामुळे अतिक्रण करून ते नियमित करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

फौजफाट्यासह आयुक्त रस्त्यावर, बांधकामं सील, दुकाने हटवली!

महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल सकाळीच मोठा फौज-फाटा घेऊन रस्त्यावर उतरले. पोलिस बंदोबस्तात रस्त्यावर थाटलेली दुकाने हटवण्यात आली तर अनेकांनी पालिकेची दिशाभूल करून उभी केलेली बांधकामे सील करण्यात आली.

लातुरात उद्योग परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या अनेक दुकानावर आयुक्त मित्तल यांनी बुलडोझर फिरवला. रस्त्याच्या कडेला अनेक व्यावसायिकांनी बेकायदेशीर रित्या दुकानं थाटली होती. याच बेकायदेशीररित्या थाटलेला दुकानांवर आयुक्तांनी कारवाई करत इथून पुढे बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण चालणार नसल्याचा इशारा दिला.

(Municipal Commissioner of Latur removed encroachments in Udyog Bhavan area)

हे ही वाचा :

महागाई वाढली, सोलापूर महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल

Maharashtra SSC Result 2021: दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘नेत्रदीपक’ कामगिरी; 97.84% निकाल लागला!