Maharashtra SSC Result 2021: दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘नेत्रदीपक’ कामगिरी; 97.84% निकाल लागला!

कोरोना संकटाच्या काळात इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली असून त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. (Maharashtra SSC Result 2021)

Maharashtra SSC Result 2021: दिव्यांग विद्यार्थ्यांची 'नेत्रदीपक' कामगिरी; 97.84% निकाल लागला!
सांकेतिक फोटो

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली असून त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे. (Maharashtra SSC Result 2021: Disabled outperform general students in Class 10 SSC exams)

यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.

12384 शाळांचा निकाल शंभर टक्के

83262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 22 हजार 767 शाळांपैकी तब्बल 22 हजार 384 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4. 65% निकाल जास्त आहे

साडे सहा लाख विद्यार्थांना फर्स्ट क्लास

राज्यात उत्तर विद्यार्थ्यांपैकी सहा लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी तर, सहा लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दोन लाख 18 हजार 70 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

साडे सोळा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले

यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झाली होती. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर करण्यात आले आहेत. (Maharashtra SSC Result 2021: Disabled outperform general students in Class 10 SSC exams)

संबंधित बातम्या:

Maharashtra SSC Result 2021 Toppers : यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!

Maharashtra SSC Result 2021 Declared : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99. 95 टक्के

Maharashtra SSC Result 2021 Declared LIVE Updates: दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत बेवसाईट http://result.mh-ssc.ac.in/ आणि https://mahahsscboard.in/ ला भेट द्या

(Maharashtra SSC Result 2021: Disabled outperform general students in Class 10 SSC exams)

Published On - 1:41 pm, Fri, 16 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI