AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान शिंदे यांच्यानंतर आता उदय सामंत हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.

एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 7:22 PM
Share

राजकीय वर्तुळातू मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रयी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत दीड तास चर्चा केली. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता मंत्री उदय सामंत देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशन सुरू असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला. त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असातना आता मंत्री उदय सामंत हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय? 

एकनाथ शिंदे यांनी आपल्या या दौऱ्याबद्दल माहिती देताना म्हटलं की ही एक सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रासह देशातील प्रश्नांवर चर्चा झाली. चर्चा अतिशय सकारात्मक झाली. अधिवेशन सुरू असलं की मी दिल्लीला येत असतो, असं आपल्या या दौऱ्याबद्दल माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता उदय सामंत देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदींसोबत चर्चा  

दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यांनी मोदींसोबत दीड तास चर्चा केली. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी मोदी साहेबांची भेट घेतली आता विरोध त्यांचं नेहमीचं काम करतील टिका करण्याचं, पण मी त्यांना कामातून उत्तर देत राहील असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल