Maharashtra SSC Result 2021 Declared LIVE Updates: अखेर दहावी बोर्डाची वेबसाईट सुरळीत, रात्री उशिरा निकाल दिसला

| Updated on: Jul 17, 2021 | 6:58 AM

Maharashtra SSC Result 2021 website crashes : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in/ आणि https://mahahsscboard.in/ या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहायला मिळेल.

Maharashtra SSC Result 2021 Declared LIVE Updates: अखेर दहावी बोर्डाची वेबसाईट सुरळीत, रात्री उशिरा निकाल दिसला
Maharashtra SSC Result 2021

Maharashtra SSC Result 2021 LIVE Updates मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही साईट डाऊन झाल्या आहेत.  हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. मात्र संध्याकाळी सहा वाजून गेले तरी वेबसाईट सुरुच झाल्या नाहीत.

दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु झाली आहे.

SSC website crash : बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील काय म्हणाले?

एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत येण्यासाठी थोडा वेळ लागणार

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२१ चा निकाल आपणास  https://bit.ly/3wKCf2c आणि  https://bit.ly/3BbB0MT  यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे.  इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली. सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण

  • एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
  • राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार
  • मुलांचा निकाल 99.94 टक्के,
  • मुलींचा निकाल 99.96 टक्के
  • 12 384 शाळांचा निकाल 100%
  • 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे

957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के

83262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 22384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jul 2021 06:52 PM (IST)

    SSC website crash : बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील काय म्हणाले?

    एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत येण्यासाठी थोडा वेळ लागणार

    माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२१ चा निकाल आपणास

    https://bit.ly/3wKCf2c आणि

    https://bit.ly/3BbB0MT

    यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • 16 Jul 2021 06:49 PM (IST)

    एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला, 60 हजार निकाल डाऊनलोड: दिनकर पाटील

    बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील काय म्हणाले?

    एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत यायला थोडा वेळ लागणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

  • 16 Jul 2021 06:42 PM (IST)

    SSC result website crash : 16 लाख विद्यार्थी दिवसभर ताटकळत

    दहावी बोर्डाचा खेळखंडोबा सुरुच, 3 नव्या लिंक दिल्या, मात्र त्या सुद्धा बंद, 16 लाख विद्यार्थी दिवसभर ताटकळत

  • 16 Jul 2021 06:40 PM (IST)

    साडेपाच तासांपासून निकालाच्या वेबसाईट बंद, बोर्डाच्या अध्यक्षांनी माध्यमांशी बोलण टाळलं

    दहावीच्या निकालाची वेबसाईट अद्यापही काही ठिकाणी सुरु नाही. गेले साडेपाच तास वेबसाईट हँग झाली आहे.  वेबसाईट सुरु कधी होणार यावर बोर्डाकडून कोणतेही ठोस उत्तर नाही.  बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. दिनकर पाटील आणि टेक्निकल टीम नॅशनल इन्फर्मेशन सेंटर (एनआयसी) कडे रवाना

  • 16 Jul 2021 06:39 PM (IST)

    महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट 5 तासानंतर सुरु पुन्हा डाऊन, अद्याप निकालाच्या साईट डाऊनच

    महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट 5 तासानंतर सुरु करण्यात आली होती ती पुन्हा डाऊन झाली. अद्याप निकालाच्या साईट डाऊनच आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीच्या निकालाच्या आणखी तीन वेबसाईट दिल्या आहेत. मात्र, त्याही अद्याप डाऊन आहेत.

  • 16 Jul 2021 06:19 PM (IST)

    दहावी निकालाच्या वेबसाईट तब्बल 5 तासानंतर बंद

    दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सकाळी पत्रकार परीषद घेत जाहीर केला. विद्यार्थ्यांसाठी निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार होता. मात्र, त्यापूर्वीच निकालाच्या दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या. तब्बल 5 तासांचा वेळ उलटून गेला तरी अद्यापही निकालाच्या वेबसाईट सुरु झाल्या नाहीत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • 16 Jul 2021 05:33 PM (IST)

    दहावीच्या निकालासाठीचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत होईल, तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार :वर्षा गायकवाड

    दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत.

  • 16 Jul 2021 05:18 PM (IST)

    दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु, दिनकर पाटील यांची तांत्रिक सदस्यांसोबत बैठक

    पुणे: दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत.  बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे.

  • 16 Jul 2021 05:16 PM (IST)

    ठाकरे सरकार हँग झालंय.. त्यामुळे SSc च्या निकालाची वेबसाईट...

    भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय."ठाकरे सरकार हँग झालंय.. त्यामुळे SSc च्या निकालाची वेबसाईट 'हँग'ली तर नवल ते काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलेली दिसतेय..." अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.

  • 16 Jul 2021 04:05 PM (IST)

    तीन तास उलटले तरी दहावी निकाल्या वेबसाईट डाऊन

    तीन तास उलटले तरी दहावी निकाल्या वेबसाईट डाऊन आहेत. दहावीचा निकाल कधी  पाहायला मिळणार, असा सवाल विद्यार्थी आणि पालक उपस्थित करत आहेत

  • 16 Jul 2021 03:29 PM (IST)

    दहावीच्या विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून शुभेच्छा

    सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालसंदर्भात शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 16 Jul 2021 02:54 PM (IST)

    दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना कधी समजणार? दोन्ही वेबसाईट दोन तास डाऊन

    दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना कधी समजणार? दोन्ही वेबसाईट दोन तास होत आले तरी डाऊन आहेत. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईटस डाऊन झाल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे.

  • 16 Jul 2021 02:27 PM (IST)

    दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे, आनंदी जीवन जगावे, उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

    मुंबई: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे, आनंदी जीवन जगावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के तर अन्य विभागांचा निकाल 99 टक्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील 99.95 टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे मी अभिनंदन करतो. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असंच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 16 Jul 2021 02:12 PM (IST)

    दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल सव्वा तास डाऊन

    दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल  सव्वा तास डाऊन झाल्या आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

  • 16 Jul 2021 01:52 PM (IST)

    दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईट डाऊन, रत्नागिरीत मुलांसह पालकांची नाराजी

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परीषद घेत दहावीचा निकाल आज जाहीर केला.  दुपारी एक वाजता मुलांना निकाल कळणार होता. मात्र बोर्ड ने दिलेली साईट ओपन होत असल्याने निकाल मिळण्यास उशीर झाला. तब्बल पाऊण तास उलटूनही अद्याप निकाल मिळालेला नाही त्यामुळे अनेक मुलांची निराशा झाली .बोर्डाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्या होत्या. मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळालेला नाही.निकाल काय लागला हे न कळल्यानं पालकांमध्ये ही नाराज आहेत.

  • 16 Jul 2021 01:08 PM (IST)

    Maharashtra SSC Result 2021Declared: दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईटस डाऊन

    SSC Result Website Down

    दहावीच्या निकालाची वेबसाईट डाऊन

    सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईटस डाऊन झाल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे.

  • 16 Jul 2021 11:47 AM (IST)

    सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर करणार: दिनकर पाटील

    अकरावीसाठी सीईटी शासनानं जाहीर केली आहे. सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर करु, सीईटी घेण्याचे आदेश राज्य मंडळाला मिळाले आहेत. न्यायालयात काही पेंडिंग नाही. आम्ही त्याचं वेळापत्रक तयार करत आहोत आणि पुढे जाणार आहे. ही परीक्षा वैकल्पिक ठेवली आहे. जे विद्यार्थी सीईटी देऊ इच्छितात त्यांच्यासाठी पोर्टल सुरु करु, असं दिनकर पाटील म्हणाले. सीईटीची डेडलाईन 21 ऑगस्ट पर्यंत जाईल. सीईटीसंदर्भात बोर्डाकडून लवकरच नोटिफिकेशन जारी केलं जाईल. अनेक भाषा आहेत पण इंग्रजी हा विषय सर्व बोर्डांसाठी असतो. इंग्रजी हा विषय सगळीकडे सारखा असतो. इंग्रजीचं व्याकरण सगळीकडं सारखं असतं. दहावीपर्यंत इंग्रजी ही दुसरी भाषा असते, असंही दिनकर पाटील म्हणाले.

  • 16 Jul 2021 11:34 AM (IST)

    957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के

    83262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 12384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

  • 16 Jul 2021 11:28 AM (IST)

    राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण

    दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

    दहावीच्या निकालात मुलींची बाजी

    दरवर्षी प्रमाणं यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.  मुलांचा निकाल 99.94 टक्के तर मुलींचा निकाल 99.96 टक्के लागला आहे.

    12 384 शाळांचा निकाल 100% लागला आहे. तर, 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे

  • 16 Jul 2021 11:25 AM (IST)

    दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के

    दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या  दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.  तर,  27 विषयांचा निकाल 1०० टक्के लागला आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

  • 16 Jul 2021 11:20 AM (IST)

    दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 99.95: दिनकर पाटील

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं परीक्षा रद्द कराव्या लागल्या. 28 मे रोजी अंतर्गत मूल्यमापनाचं सूत्र ठरलं. त्या आधारे सर्व शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचे गुण राज्य मंडळाच्या पोर्टल वर भरला. त्यानंतर मंडळानं निकाल प्रोसेस केला आहे.

    निकालसंदर्भातील महत्वाची गोष्ट म्हणजे जे उत्तीर्ण झालेत त्यांचं अभिनंदन करतो. शाळा, संस्था आणि प्राचार्य यांनी वेळेत काम पार पाडला. मंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही मेहनत घेतली त्यामुळे आज आपण निकाल जाहीर करत आहोत.

    कोकण विभागाचा निकाल 100 टक्के सर्वाधिक आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

    27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित उत्तीर्ण विद्यार्थी सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्र्यांऐशी विद्यार्थी प्राविण्य प्रथम श्रेणीत, सहा लाख 98 हजार८८५ प्रथम श्रेणीत   २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ९ ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

  • 16 Jul 2021 11:11 AM (IST)

    महाराष्ट्र एससी एचएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करणार

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल काही वेळात होणार जाहीर

    महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करणार

  • 16 Jul 2021 10:57 AM (IST)

    दहावीच्या निकालाकडं विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष

    कोरोना विषाणू संसर्गामुळं दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारनं निकालाचं सूत्र ठरवलं होतं. त्याप्रमाणं गुण देण्यात आले आहेत. दहावीच्या निकालाकडं 16 लाख 58 हजार विद्यार्थ्यांसह पालकांच लक्ष लागलं आहे. निकालाची प्रत विद्यार्थ्यांना काही दिवसानंतर त्यांच्या शाळेमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल.

  • 16 Jul 2021 10:31 AM (IST)

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निकालाची तारीख जाहीर करताना त्यांनी या शुभेच्छा दिल्या.

  • 16 Jul 2021 10:29 AM (IST)

    16 लाख 58 हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील एकूण आठ माध्यमानुसार सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे.

  • 16 Jul 2021 10:28 AM (IST)

    दहावीचा निकाल 'या' वेबसाईटवर जाहीर होणार

    सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

    या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

  • 16 Jul 2021 10:27 AM (IST)

    दहावीचा निकाल कशाच्या आधारे जाहीर होणार? निकालाचं नेमकं सूत्र काय?

    दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

    i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.

    ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.

    iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Published On - Jul 16,2021 10:24 AM

Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.