AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार?

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली आहे. आता वनडे वर्ल्डकप 2027 आणि ऑलिम्पिक 2028 स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. असं असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार का? चला जाणून घेऊयात.

WTC 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार?
WTC 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार?Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 17, 2026 | 7:50 PM
Share

भारताने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. मात्र रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी हवी तशी झालेली नाही. गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देशात झालेल्या दोन कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारतीय संघाला दोन्ही मालिकांमध्ये व्हाईट वॉश मिळाला हे सर्वात दुर्दैवी म्हणावं लागलं. न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्याने भारताचं 2025 अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका 2-0 ने गमल्याने गणित बिघडलं आहे. भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणं अशक्य नाही, पण कठीण असणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. पहिल्या दोन स्थानावर येण्यासाठी उर्वरित 9 सामने खूपच महत्त्वाचे असणार आहेत.

टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी 4 सामने जिंकले, 4 सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. यासह 48.15 या विजयी टक्केवारीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.सहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला अजून 9 सामने खेळायचे आहेत. या 9 सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते यावर अंतिम दोन स्थानावर जागा मिळणार की नाही? ते ठरणार आहे. अंतिम सामन्यासाठी पात्र होण्याकरिता अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे.

टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी 9 सामन्यांपैकी किमान 7 सामने जिंकावेच लागतील. तरच विजयी टक्केवारी ही 62.96 टक्के होईल. त्यामुळे इतर संघांना मागे टाकून पहिल्या दोन स्थानी जागा मिळेल. टीम इंडियाने उर्वरित 9 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले, तर थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. म्हणजेच भारताने 9 पैकी 7 सामने जिंकले, तरी इतर संघांच्या निकालांची वाट पाहावी लागेल. भारताचे पुढील प्रतिस्पर्धी श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आहेत.

भारतीय संघ नऊ पैकी 5 सामने हे भारतात खेळणार आहे. हे पाचही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळेल. भारतीय संघापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे श्रीलंका आणि न्यूझीलंडचा त्यांच्याच भूमीवर सामना करण्याचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात कसोटी मालिका असली तरी 5-0 ने मात देणं कठीण आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल