AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, कर्मचारी धक्क्यात, अत्यंत गुप्तता पाळत थेट..

पुण्याच्या आयटी पार्कमध्ये धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर काही वेळ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. काय होत आहे हेच कळत नव्हते. अमेरिकेचे लष्कर पुण्याच्या आयटी पार्कमध्ये घुसले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, कर्मचारी धक्क्यात, अत्यंत गुप्तता पाळत थेट..
US military
| Updated on: Aug 08, 2026 | 8:26 AM
Share

Pune Hinjewadi IT Park : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क कायमच चर्चेत असतो. तिथे मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. जगप्रसिद्ध आयटी कंपन्यांचे ऑफिसेस आहे. दिवस रात्र तिथे काम सुरू असते. अत्यंत सुरक्षित म्हणून हिंजवटीच्या आयटी पार्ककडे बघितले जाते. मात्र, बुधवारी हिंजवडीतील आयटी पार्क येथे खळबळजनक घटना घडली. थेट अचानक NSG कमांडर आणि अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो आयटी पार्कमध्ये शिरले. यादरम्यान उपस्थित लोक प्रचंड घाबरले. नक्की काय घडले कोणालाच कळत नव्हते. फक्त भारतीय लष्करच नाही तर अमेरिकेचे कमांडर पोहोचल्याने सर्वजण गोंधळात होती. अत्यंत गुप्तता यादरम्यान पाळण्यात आली. अमेरिकेचे लष्कर हिंजवडी आयटी पार्कमध्ये नक्की का आले आण काय घ़डले, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसल्या. कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची दहशत होती.

अमेरिकेचे सैन्य कमांडर आणि एनएसजी फोर्स वन या तिन्ही सुरक्षा दलाकडून आयटी पार्कमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. दहशतवादी हल्ला झाल्यासारखे चित्र निर्माण करण्यात आले. एक दोन नाही तर तब्बल सहा तास हे मॉक ड्रिल सुरू होते. अत्यंत मोठी गुप्तता यादरम्यान पाळण्यात आली. आयटी पार्कमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, असे चित्र निर्माण करण्यात आले.

हिंजवटी फेज 2 मध्ये इन्फोसिसच्या कॅम्पमध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड याच्या सहकार्याने मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये अमेरिकेच्या सैन्यातील तब्बल 17 कमांडो सहभागी झाली होती. त्यांच्यासोबत 26 स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपचे अधिकारी, कमांडो, फोर्स वन आणि पुणे पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोझी शाळा, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले होते

5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 9 दरम्यान मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. दहशतवादी हल्ला झाल्यावर प्रतिसाद नक्की कसा द्यायचा याचे प्रशिक्षण यादरम्यान देण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्री 9 पर्यंत हे मॉक ड्रिल सुरू होते. अत्यंत गुप्तता या मॉक ड्रिलबद्दल पाळण्यात आली होती. याबाबत कोणालाही माहिती नव्हती. अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. ज्यामुळे नक्की काय घडले हे कोणालाही समजले नाही.

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण