AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 ते 18 ऑगस्टला मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार, सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट, पोलिसांनी थेट..

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टने मोठी खळबळ उडाली. थेट मुंबईवर दहशतवादी हल्ला कधी होणार या आशयाची पोस्ट ही शेअर करण्यात आली. या पोस्टनंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आलेत.

9 ते 18 ऑगस्टला मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार, सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट, पोलिसांनी थेट..
Mumbai
| Updated on: Aug 05, 2026 | 12:20 PM
Share

मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून घटनेची गंभीर दखल घेतलीये. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @AstroPrashnath9 या हँडलवरून ऑगस्ट 2026 दरम्यान भारतासाठी धोक्याचा इशारा देणारी पोस्ट करण्यात आली. ही पोस्ट शेअर करण्यात आल्याने खळबळ उडाली. या पोस्टमध्ये 9 ते 18 ऑगस्ट हा अतिशय धोकादायक कालावधी असून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोठ्या हल्ल्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही पोस्ट इंग्रजीत असून यात “India shall be careful in the month of August 2026…9th to 18th August very dangerous time period…Big terrorist attacks possible by Pakistani. Terrorists. असे म्हटले आहे. अनेकांनी ही पोस्ट रिशेअर देखील केली.

सोशल मीडियावर मुंबईबाबत दावा करणारी धक्कादायक पोस्ट 

ही पोस्ट @tstark86v1 या हँडलद्वारे टॅग करून पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पोलिसांकडून या पोस्टची दखल घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेसेज आणि फोन सतत मुंबई पोलिसांना येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ताज हॉटेल उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती.

दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या दाव्यानंतर पोलिस अलर्ट 

हेच नाही तर भारतीय विमान कंपन्यांनाही विमानात बॉम्ब हल्ल्याचा फोन किंवा मेल येण्याच्याही घटना सतत घडत होते. ज्याचा फटका विमान कंपन्यांना सहन करावा लागला. त्यामध्येच आता सोशल मीडियावर अशाप्रकारची पोस्ट शेअर करण्यात आली. पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीकडे याबाबत काही माहिती आहे का? याचा तपास हा केला जात आहे.

पोलिसांनी घेतले पोस्टला अत्यंत गांर्भियाने थेट चाैकशी

मुंबई पोलिसांनी ही पोस्ट अत्यंत गांर्भियाने घेतला. यासंदर्भात चाैकशी सुरू आहे. कधी कोणत्या सरकारी इमारतीला तर कधी कोणत्या अभिनेत्याच्या घराला उडवण्याची धमकी दिली जाते. आता तर थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुंबईवर कधी मोठा हल्ला होऊ शकतो, असे म्हटल्याने अधिक खळबळ उडाली.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार