AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसण्यासाठी रहा तयार ! अजय देवगण पुन्हा करणार कॉमेडीचा धमाका; ‘गोलमाल 5’ची रिलीज डेट समोर

अभिनेता अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्या बहुचर्चित, हिट फ्रँचायजी 'गोलमाल ' 5 ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. थिएटरमध्ये कधी पाहता येणार हा चित्रपट ?

हसण्यासाठी रहा तयार ! अजय देवगण पुन्हा करणार कॉमेडीचा धमाका; ‘गोलमाल 5’ची रिलीज डेट समोर
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 3:06 PM
Share

गोलमाल फ्रँचायजीमधील चित्रपट प्रचंड लोकप्रिय आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचे 4 भाग आले असून सगळ्यांनाची चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या 5 व्या भागाची चाहते अतिशय उत्सुकतेन वाट बघत आहे. फायनल चित्रपटाच्या मेकर्सनी आज ( शनिवारी) या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नेमका कधी रिलीज होणार आहे ?

कधी रिलीज होणार गोलमाल 5 ?

कॉमेडीने भरलेली ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा पाचवा भाग पुन्हा एकदा मस्ती, हास्य-विनोद आणि धमाल घेऊन येणार आहे. निर्मात्यांनी शनिवारी ‘गोलमाल 5’च्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘गोलमाल 5’चे अधिकृत पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या पोस्टरमध्ये अजय देवगण बाईकवर असून त्याच्यासोबत अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि कुणाल खेमू हे मस्तीच्या अंदाजात दिसत आहेत. “ हास्य-मस्ती, आनंद आणि कुटुंब… बस, आणखी काही नाही. 8 जानेवारी 2027 .” असं या सोबत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. म्हणजेच हा चित्रपट पुढल्या वर्षी, 8 जानेवारी 2027 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

अजय देवगण -रोहित शेट्टीची जोडी पुन्हा करणार धमाल

अजय देवगण आणि रोहित शेट्टी हे पहिल्यापासूनच ‘गोलमाल’ फ्रँचायजीचा महत्वाचा भाग राहिले आहेत. अभिनेता- दिग्दर्शकाची जोडी आता या फ्रँचायजीचा पाचवा भाग घेऊन येणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अर्शद वारसी, श्रेयस तळपडे, कुणाल खेमू, शर्मन जोशी आणि तुषार कपूर यांसारखे स्टार्सही सोबत दिसणार आहेत.

‘गोलमाल’च्या चित्रपटांनी अनेक कलाकारांचा समावेश असलेली स्टारकास्ट, मजेदार गैरसमज आणि सतत वाढत जाणाऱ्या गोंधळलेल्या परिस्थितींमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पाचव्या भागातही निर्माते हीच भरपूर कॉमेडी कायम ठेवतील आणि जुन्या पात्रांसाठी एक नवी कथा घेऊन येतील, अशी अपेक्षा आहे.

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा