AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...

दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम…

| Updated on: Sep 19, 2026 | 1:02 PM
Share

नांदेडमध्ये झालेल्या मराठवाडा विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत नेत्यांच्या ताटात काजू-बदाम ठेवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीत अशा पाहुणचारावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आम्हाला बदनामी सहन करावी लागते, असे ते म्हणाले.

नांदेड येथे मराठवाडा विभागीय दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान नेत्यांच्या ताटात काजू-बदाम ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीत, जिथे खरीप हंगाम वाया गेला आहे आणि शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत, अशावेळी अधिकाऱ्यांनी हा अनावश्यक पाहुणचार केल्याने नेत्यांना बदनामी सहन करावी लागते, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. या बैठकीत मेघना बोर्डीकर, संजय जाधव आणि अतुल सावे उपस्थित होते.

यात संजय जाधव यांच्या काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ विशेषतः व्हायरल झाला. शिरसाट यांनी या कृतीला पाहुणचार नसून, अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली गैरकृत्ये ठरवले आणि ते विभागीय आयुक्तांशी या संदर्भात बोलणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असताना आणि शेतकरी साधी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढत असताना, नेत्यांच्या ताटात दिसलेल्या काजू-बदामामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.

Published on: Sep 19, 2026 01:02 PM

Follow Us