AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?

8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?

| Updated on: Sep 19, 2026 | 1:52 PM
Share

सतीश साळियन यांनी आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची मानहानी नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला. सीबीआयने त्यांना "८-१० दिवसांत सर्व सत्य बाहेर येईल" असे आश्वासन दिले आहे. यापूर्वी मुंबई पोलीस आणि एसआयटीने केलेल्या तपासावर साळियन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे.

आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गेले सहा वर्षे संघर्ष करत असलेले सतीश साळियन पुन्हा चर्चेत आले आहेत. सीबीआयने त्यांना “आठ ते दहा दिवसांत सर्व सत्य बाहेर येईल” असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर सतीश साळियन यांनी आदित्य ठाकरे यांना ५०० कोटी रुपयांची मानहानी नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते आज मातोश्रीवर पोहोचले होते. साळियन यांनी यापूर्वी मुंबई पोलीस आणि महायुती सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही तपासांमध्ये फाऊल प्ले नसल्याचे म्हटले गेले, मात्र साळियन यांचा दावा आहे की हे तपास चुकीचे होते. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुलाला वाचवल्याचा आरोपही केला आहे.

आता त्यांना सीबीआयवर १००% विश्वास असून, न्याय नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे. आपल्या मुलीला त्रास देणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मातोश्रीवर प्रवेश न मिळाल्यास पोलिसांनी नोटीस स्वीकारून घ्यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Published on: Sep 19, 2026 01:50 PM

Follow Us